तरूणांनी आत्मनिर्भर बनावेः आ. सुभाष देशमुख
स्पर्शरंग परिवारातील चित्रकारांचे केले कौतूक
सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापुरातील कलाकारांनी टाकाऊपासून टिकावूचा वापर करत दुर्गामातेची प्रतिकृती केली आहे. प्रत्येकाकडे एकप्रकारचे कौशल्य असते. या तरूणांना यानिमित्ताने कौशल्य प्रकट करण्याची संधी मिळाली आहे. सोलापुरातील सर्व तरूणांनी अशाच प्रकारे पुढे येत आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूरमधील स्पर्शरंग परिवाराचे युवा कलाकार विपुल मिरजकर आणि सहकलाकार प्रमोद दासरी, निखिल तलकोकुल, शुभम कामाठी, अशिष रेगल यांनी दसर्याच्या सणाचे औचित्य साधून कुचन प्रशालेच्या मैदनावर चाळीस हजार चौरस फूट जागेत बंगालच्या आदिशक्ती दुर्गा देवी दुर्गा देवीचे चित्र रेखाटले आहे. याची बरीच चर्चा झाल्यानंतर आ. देशमुख यांनी कुचन प्रशालेत जाऊन चित्राची पहाणी केली तसेच कलाकारांच्या गुणांचे कौतूक करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक अविनाश बोंमडयाल, महेश देवकर, भाजयुमोचे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, संदीप महाले व पदाधिकारी उपस्थित होते.