घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं… बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती

0
410

घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं…
बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती

बार्शी : जेवण चांगलं मिळतंय का….वेळेवर साफ-सफाई होते का….उपचार व्यवस्थित मिळतात का….हो घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे….इथं चांगली काळजी घेतली जात आहे…..हा संवाद आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय पॉलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि कोरोना रुग्णांमधील.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अंकित, तहसीलदार डी.एस. कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष  जोगदंड आदी उपस्थित होते.

भरणे यांनी रविवारी सायंकाळी बार्शीतील कोविड केअर सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, रुग्णांकडून माहिती घेतली. आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. शासन आपल्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे. तुम्ही बरे होताय, काळजी करू नका. मनोधैर्य वाढवा, खचू नका, असेच हसत खेळत रहा, घाबरू नका, अशा शब्दात भरणे यांनी रूग्णांना धीर दिला.

बार्शीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालय वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे पॉलिटेक्निक कॉलेज याठिकाणीचार तर वैरागमध्ये श्रीसाई आयुर्वेदिक महाविद्यालयात कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी असणाऱ्या त्रुटींची त्वरित पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

सूरपाट्यांनी भारावले पालकमंत्री
पालकमंत्री भरणे आले त्यावेळी एकीकडे देशभक्तीपर गीते तर एकीकडे रुग्णांमध्ये सुरपाट्याचा खेळ रंगात आला होता. हे पाहून पालकमंत्री भारावून गेले. त्यांनी काही अंतरावरून रुग्णांशी संवाद साधला. आपणही सूरपाट्या खेळल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

वृक्षारोपण करण्याची रूग्णांची इच्छा

आम्ही रूग्ण म्हणून याठिकाणी असलो तरी या महाविद्यालयातील कोविड सेंटरची आठवण म्हणून आम्हाला येथे वृक्षारोपण करायचे आहे, खड्डे खांदून तयार आहेत, असे एका रूग्णाने पालकमंत्र्यांकडे विनंती केली. श्री. भरणे म्हणाले, हा चांगला उपक्रम आहे. रोपांची व्यवस्था त्वरित रोपे करण्यात येईल. 

नागपंचमींला महिला रूग्णांचा फेर या कोविड केअर सेंटरमध्ये मुले, मध्यमवयस्क, महिला हे आपल्या आवडीचे खेळ खेळत आहेत. नागपंचमीला महिलांनी सेंटरमधील मैदानातच फेर धरल्याचे रूग्णांनी आवर्जुन सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here