“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे… अमृता फडणवीसांचे सूचक ट्विट

0
143

“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे… अमृता फडणवीसांचे सूचक ट्विट

मुंबई – आज देशभरात फ्रेंडशिप डे साजरा (Friendship Day Celebration) केला जात आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Wife Tweet) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis Friendship Day Tweet) यांनी ‘फ्रेंडशिप डे’संदर्भात एक सूचक ट्विट केले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधील वैर राजकीय वर्तुळाला नवीन नाही. मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना पायऊतार व्हावे लागल्यानंतर त्यांनी कशी नशिबाने थट्टा मांडली गाण्याचा उल्लेख करत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यातच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने या दोघांचा फोटो शेअर करत दिलेले कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. 

यामध्ये अमृता यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. ‘ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत’ असे कॅप्शन देखील अमृता फडणवीस यांनी या पोस्टला दिले आहे.

काय आहे ट्विटमध्ये? – देशभरात आज फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राजकारणी देखील हा दिवस आपल्या राजकीय मित्रांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत साजरा करत असतात. अशाच आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत.

या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस दिसत आहेत. या फोटोला साजेसे कॅप्शन देखील अमृता यांनी दिले आहे. ‘ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत’ असे कॅप्शन या पोस्टला अमृता फडणवीस यांनी दिले आहे.

किशोरी पेडणेकरांचा अमृता फडणवीसांना गाण्यातून चिमटा – एका टीव्हीशो मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. “कशी नशिबाने थट्टा आज मांडली” हे मराठी चित्रपटातील गाणे ऐकल्यानंतर तुम्हाला कोणाची आठवण होते? असा प्रश्न निवेदकाने अमृता फडणवीस यांना विचारले असता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आठवण आपल्याला होते, असे उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले होते. त्यावर मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याला गाण्यातून उत्तर देत चिमटा घेतला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here