महाविकास आघाडी सरकार मधील ‘या’ बड्या अपक्ष मंत्र्यांने केला शिवसेनेत प्रवेश

0
4611

मुंबई : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंकरराव गडाख यांनी आज मंगळवार रोजी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेने याबाबत अधिकृत ट्विट करत माहिती दिली आहे.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अहमदनगरमधील नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार असलेले शंकरराव गडाख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर आता गडाखांवर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गडाख यांच्या शिवसेना प्रवेशामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राठोड यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी गडाख यांना शिवसनेत प्रवेश देऊन त्यांच्या हाती नगर जिल्ह्याचा कार्यभार सोपवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here