चिंताजनक: शनिवारी सोलापूर जिल्ह्यात 677 कोरोना रुग्ण वाढले , 12 जणांचा मृत्यू

0
388

चिंताजनक: शनिवारी सोलापूर जिल्ह्यात 677 कोरोना रुग्ण वाढले , 12 जणांचा मृत्यू

सोलापूर – शनिवार 3 एप्रिल 2021 रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर  शहर आणि ग्रामीण जिल्हयात  मिळून 677 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात 277 रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर जिल्हा ग्रामीणमध्ये 400 रुग्ण वाढले असून 5 जण मयत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शनिवारच्या अहवालानुसार सोलापूर शहरात 2043 चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 1766 निगेटिव्ह तर 277, पाँझिटिव्ह आहेत.आज 179 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात 7 जण मयत आहेत. शहरातील आजवरची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16976 एवढी असून 748 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 3015 जण उपचार घेत असून 13213 जणांनी या आजारावर मात केली आहे.

शनिवारी जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 137 यापाठोपाठ माढि तालुका 64, माळशिरस 58, पंढरपूर 49 अशी नोंद आहे. आजच्या अहवालानुसार जे 5 मृत्यू नोंदले गेले आहेत. यात बार्शी तालुक्यात दोन तर मोहोळ , माढा व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. दिवसात एकूण 4 हजार 673 चाचण्या झाल्या असून यापैकी 4272 निगेटिव्ह आहेत तर 400 पॉझिटिव्ह आहेत. 338 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये 46 हजार 980 कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी 1247 जणांचा या आजारात मृत्यू झाला आहे तर 42 हजार 081 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3 हजार 652 जणांवर उपचार सुरू आहेत.

सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 9 हजार 044 इतके आढळून आले असून यापैकी 250 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 हजार 347 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 447 जणांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी पंढरपूर शहरात 23 तर ग्रामीणमध्ये 26 कोरोना रूग्णांची नोंद आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here