चिंताजनक: बार्शी तालुक्यात नव्याने आढळले ४९ कोरोना बाधित रुग्ण,तर चार मयत
गणेश भोळे
बार्शी : बार्शी तालुक्यात दि . २३ ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात ४९ रुग्ण बाधित रुग्णांची वाढ झाली तर ४ रुग्ण मयत झाले आहेत. यात शहरात ३६ तर ग्रामिण मध्ये १३ बाधित रुग्ण आढळले आहेत.

बार्शी तालुक्यात कोरोना बाधित वाढ सुरूच असुन आलेल्या अहवालात अलीपुर रोड ३, क्रांतीसिंहनगर १, कापसे बोळ १, गायकवाड प्लॉट १, घोडके प्लॉट २, नाळे प्लॉट ४, वायकुळे प्लॉट ३, उपळाई रोड १, कासारवाडी रोड २, कोष्टी गल्ली २, गाडेगाव रोड ४, मुसळे प्लॉट १, भवानी पेठ १, सुभाष नगर २, देशमुख प्लॉट १, मांगडे चाळ २, दत्तनगर १, ढगेमळा १, सावळे चाळ १, राऊत गल्ली १, राऊत प्लॉट १, असे ३६ बाधित रुग्ण शहरात सापडले आहे.
तर ग्रामिणमध्ये वैराग१ ,काळेगाव १, कोरफळे ३, खांडवी ४, खडकलगाव १, उपळे दु १, घोळवेवाडी १, गोरमाळे १ असे १३ रुग्ण सापडले आहे .


बार्शी तालुक्यात आजवर कोरोना बाधित एकुण रुग्णांची संख्या १८३७ वर पोहचली असुन त्यापैकी आजवर १५७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली यामुळे बार्शी तालुक्यात सदया शहरातील १५२ तर ग्रामिण मधील ३१ असे १८३ अॅक्टीव बाधित रुग्ण आहे. आज ४ रुग्ण मयत झाल्याने आतापर्यंत ७८ मयताची नोद झाली आहे.

___________