चिंताजनक: बार्शीत तीन दिवसात २७१ नवे कोरोना रुग्ण सापडले
कोरोना संसर्गात होतेय वाढ
बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मागील तीन दिवसात २७१ कोरोना बाधीत . संख्या झाल्यामुळे बार्शीकरांच्या चिंतेत भर पडत आहे.


आज (बुधवार,१९ जानेवारी) बार्शी शहर व तालुक्यात ११६ रुग्ण आढळले आहेत. तर मागील दोन दिवसात १५५ रुग्ण वाढ झाली आहे.यामध्ये बार्शी शहरात 116 तर ग्रामीण भागात 39 रुग्ण आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक ढगे यांनी दिली. दोन दिवसात 1393 जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.

दोन दिवसात शहरात 386 तर ग्रामीण भागात 717 जणांच्या अशा एकूण 1103 जणांच्या करण्यात आल्या.
दिवसेंदिवस बार्शी शहरात कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने वाढत असताना शहरात कोरोना नियमाचे पालन होत नसल्याने तसेच नागरिक विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येत आहे ठिक ठिकाणी गर्दी शहरात दिसुन येत आहे.