बार्शी : कर्तुत्ववान महिला हे समाजाचे भूषण असतात याच महिलांमुळे इतिहास घडतो असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले ते स्व. शोभाताई सोपल समाजसेवी संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित स्त्री भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते

यावेळी महिला दिनाचे औचित्य साधुन स्त्री भुषण पुरस्काराने कोरोना काळातील कामाबद्दल डॉ. सौ. स्नेहल माढेकर ,डॉ. सौ. शितल बोपलकर, सौ. अर्चना थिटे , पहिली बार्शीतील पायलट कु. साची वाडकर यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा मंगल शेळवणे माजी उपनगराध्यक्ष अरूणा परांजपे माजी नगरसेविका वर्षा रसाळ सौ अलका सोपल आदी मान्यवर उपस्थित होते

सौ उज्वला सोपल यांनी प्रास्ताविकपर भाषणात स्वर्गीय शोभाताई सोपल समाजसेवी संस्थेच्या वतीने दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून बार्शी आणि परिसरातील कर्तबगार महिलांचा स्त्री भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. ही परंपरा अखंडित सुरू असल्याचे सांगितले. यावेळी पुढे बोलताना सोपल म्हणाले की महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने करण्यात येणारे अशा प्रकारचे आयोजन कौतुकास्पद आणि स्तुत्य असून आज गौरविण्यात आलेल्या सर्व सत्कार मूर्तींचे त्या त्या क्षेत्रातील योगदान हे भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी डॉ. सौ. स्नेहल माढेकर, डॉ. सौ. शितल बोपलकर, सौ. अर्चना थिटे, कु. साची वाडकर, सोपल साहेब, उमा विभुते, भाग्यश्री घोडके यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. अश्विनीताई बुडुख यांनी केलेयावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंदाताई काळे, मंगलताई पाटील, करुणाताई हिंगमीरे, कल्याणीताई बुडुख, मिनाताई धर्माधिकारी, सुमनताई बारसकर, मिनाताई पवार, महादेवी गोटे, सुमनताई कांबळे उपस्थित होते.