तु डस्ट का सारली तुला लय माज आला का असे म्हणत दोघांनी मिळून एकास शिविगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील नारी येथे घडला.

अनिल उत्तम शिंदे व अज्ञानबाई उत्तम शिंदे दोघे रा नारी ता बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. दोघांना अटक करून आज सोमवारी बार्शी न्यायालयात उभे करण्यात आले होते.
समाधान बाळासाहेब शिंदे ,वय-25वर्षे,रा- नारी ता बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या घराशेजारीच राहणेस असणारे अनिल शिंदे यांचे घराचे बांधकाम चालु असुन घरासमोर वाळु व डस्ट टाकलेली आहे.
साकाळी 06/30 वा चे सुमारास ते बाहेर जात असताना घरासमोर रोडवर अनिल शिंदे यांनी त्यांचे बांधकामीसाठी आणुन रोडवर वाळु व डस्ट टाकलेली असलेमुळे तेथुन जा ये करता येत नसलेमुळे फिर्यादी थोडीशी डस्ट पायानी एका बाजुला सारुन तेथुन जात असताना अनिल शिंदे हा तेथे लगेच पळत आला व म्हणाला कि, तु डस्ट का सारली तुला लय माज आला का. असे म्हणुन फिर्यादीचे अंगावर धावुन येवुन शिवीगाळी करत हाताने लाथा बुक्याने माराहण करू लागला.

त्यावेळी फिर्यादी म्हणाले की अरे ही डस्ट रोडवर असलेमुळे मला व माझे घरच्यांना जा ये करणे करीता त्रास होत आहे याचे मुळे माझी आजी व मुलगा पडले आहेत म्हणुन मी सारली असे म्हणुन ते लगेच घरी गेले. तेव्हा अनिल शिंदे याने हातात काठी घेवुन पळत फिर्यादीचे मागे घरात जाऊन त्याचे हातातील काठीने मारहाण करू लागला त्यावेळी त्याची आई अज्ञानबाई शिंदे ही घरासमोर उभारून घरच्यांना शिवीगाळी करू लागली.
पांगरी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पांडुरंग मुंढे हे करत आहेत.