चर्चा तर होणारच ! कोरोनापासून बचावासाठी बनवला चक्क पाच तोळ्यांचा ‘गोल्डन’ मास्क
पिंपरी,पुणे – आधीच पाचही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ असलेल्या पिंपरी चिंचवडच्या शंकर कुऱ्हाडे यांनी कोरोनापासून बचावासाठी चक्क पाच तोळ्यांचा ‘गोल्डन’ मास्क बनवून घेतला आहे.

साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी त्यांनी तब्बल दोन लाख ९० हजार रुपये खर्च केले आहेत. शंकर कुऱ्हाडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, हा गोल्डन मास्क पातळ असून त्याला बारीक छिद्र आहेत. त्यामुळे श्वास घायला अडचण येत नाही.

पण यामुळे कोरोनापासून बचावासाठी किती फायदा होईल, हे सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
शंकर कुऱ्हाडे यांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड आहे. आधीच त्यांच्या पाचही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि त्यात आता या गोल्डन मास्कची भर पडली आहे.
कोरोनाच्या महामारीत बनवलेल्या त्यांच्या या सोनेरी मास्कमुळं सध्या उलट-सुलट चर्चाही सुरु आहेत, पण या चर्चांना ते भीक घालायला तयार नाहीत. कुऱ्हाडे म्हणतात चर्चा तर होणारच !.