पत्नीसह मेहुणीवर कोयत्याने वार, बार्शीत एकावर गुन्हा दाखल

0
15467

बार्शी : चारित्र्याच्या संशयावरून माहेरी आलेल्या पत्नीवर पतीने भर दिवसा घरात घुसून कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. मध्यस्थी करणाऱ्या मेव्हणीवरही वार केल्याने हल्ल्यात दोघीजणी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास शहराच्या टिळक चौक परिसरात घडली. हल्लेखोर पती स्वतःहून शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. जखमी पत्नी अश्विनी पवार (वय 30, रा. टिळक चौक) हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती गौरीशंकर पवार (वय 32, रा. सोलापूर) याच्यावर प्राणघातक हल्ल्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात फिर्यादी अश्विनी व तिची धाकटी बहीण रेश्‍मा चौगुले (वय 21, रा. टिळक चौक) जखमी झाल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अश्विनी चौगुले हिचा विवाह सोलापूर येथील मजुरी करणाऱ्या गौरीशंकर पवार यांच्याशी आठ वर्षांपूर्वी झाला होता. विवाहानंतर अश्विनीला अपत्ये झाली. काही महिन्यांपासून पती गौरीशंकर हा पत्नी अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडत होता. पतीच्या भांडणाला कंटाळून अश्विनी माहेरी बार्शीला तिची बहिणी रेश्‍मा चौगुले हिच्याकडे आली होती. शनिवारी दुपारी सोलापूरहून गौरीशंकर हा पत्नीला सासरी नेण्याचे कारण पुढे करून बार्शीला आला होता.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नीच्या अंगावर व पाठीवर कोयत्याने तीक्ष्ण हत्याराने वार करून तिला गंभीर जखमी केले. तर भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मेहुणी रेश्‍मावरही त्याने हल्ला केल्याने तीही जखमी झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल ननावरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here