पस्तीशी-चाळीशीच्या बायका छान का राहतात? ,वाचा सविस्तर

0
2010

पस्तीशी-चाळीशीच्या बायका छान राहतात,
वेगवेगळ्या फॅशन करतात, छान दिसतात, मजा करतात. काय असेल रहस्य?या वयातील माझ्यासारख्या सख्यांच्या संसाराला पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे झालेली असतात.संसारात त्या मुरलेल्या, रुळलेल्या असतात. मुलं मोठी झालेली असताना. अगदीच त्यांच्यावर अवलंबून नसतात.

आपली कामं स्वतः करतात. मुलांना खायला देणं, क्लासेसला सोडणं – आणणं असं थोडस करावं लागतं. मुलांच स्वतःच एक विश्व तयार होत असतं.त्यामुळे ते त्यात दंग – गुंग असतात. ती जर नोकरी करणारी असेल, तर ती गुंतलेली असते. आणि गृहिणी असेल तर या वयात तिला थोडी मोकळीक मिळते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

लग्न झाल्यापासून ती सतत एकापाठोपाठ एक अश्या जबाबदारऱ्यांमध्ये, नात्यांच्या गोतावळ्यात, नवरा – मुलं, आजारपण, सण – समारंभ, गृहकलह यात ती व्यस्त असते. एवढ्या वर्षात तिला डोकं वर काढायला वेळ मिळत नाही. प्रत्येकीला या साऱ्यातून जावचं लागतं. संसाराची तारेवरची कसरत करता करता १५, २० वर्षे सहज निघून जातात. आणि मग तिच्या आयुष्यात येते थोडी स्थिरता, थोडी मोकळीक! ………

आयुष्याच्या या तिच्या चाळीशीच्या वळणावर ती भक्कमपणे पाय रोऊन संसारात उभी असते. अनुभवाची शिदोरी तिच्याकडे असते. आत्मविश्वास तिच्या चालण्या – बोलण्यात – वागण्यात आपसूकच दिसतो. नवखेपणा, अवघडलेपणा तिच्यात नावालाही जाणवत नाही. अचूक निर्णय ती वेळोवेळी घेते.

वागण्या – बोलण्यातील तारतम्य, कामाचा उरक, घरगुती राजकारणी खेळी ती सहज खेळते. संसारातील नात्यांचे गमक तिला उलगडलेले असते. पै – पाहुण्यांचं दडपण तिला येत नाही. घराचे अधिकार तिच्याकडे असल्याने कोणती भाजी करायची ते कोणती वस्तू घ्यायची हे सगळं ती कुशलतेने करते

संसाराची घडी व्यवस्थित बसलेली असते. जबाबदार्‍या कमी झालेल्या असतात किंवा ती त्या वकुबीने हाताळत. या वेळी तिला मोकळीक मिळते. मग ती छान राहते. छान दिसण्याचा प्रयत्न करते. वयाची झाक चेहर्‍यावर, केसांवर दिसू लागते. यावर घरगुती, पार्लरमध्ये जाऊन उपाययोजना करते.

या वयात वजनाचा काटाही “वाढता वाढता वाढे” असतो. त्यामुळे मग वजन कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न केले जातात. फिरायला जाणे, सूर्यनमस्कार घालणे, दोनदाच जेवणे, वजन करण्यासाठीचे व्हिडिओ तासंतास बघणे. असे सगळे प्रयोग सुरू असतात. यातलं टिकाऊ काही नसतं. स्वतः च्या सौंदर्याकडे ती जातीने लक्ष देते. कपड्यांच्या बाबतीतही हेच. कपड्यातील तोच – तो पणा टाकून ती नवनवीन फॅशनचे कपडे घालून मिरवते. मेकअप करते. याआधी ती लीपस्टीक च्या वर कधी गेलेली नसते.

आता मात्र ती छान मेकअप करते. आजपर्यंत एवढ लक्ष तिने स्वतःकडे दिलेलं नसतं. सगळी हौस ती करते. याच काळात तिचं मन भूतकाळात फार रमतं. माहेरचे, लहानपणीचे, शाळा-कॉलेजचे दिवस, मैञिणी, गप्पा, मावश्या – मामा, भावंड हे सगळं तिच्या मनात रुंजी घालतं. १५, २० वर्षात आपल्याभोवतीचं लहान झालेलं वर्तुळ ती विस्तारण्याचा, मोठं करण्याचा प्रयत्न करते.

या काळात मैञिणी तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सगळ्या सुखं – दुःखाच्या त्या भागीदार असतात. त्यांच्यासोबत ती दिलखुलास हसते, गप्पांमध्ये रंगते, हॉटेलींग करते, सहलीला जाऊन धमाल करते, छान – छान फोटो काढून ती शेअर करते. आयुष्याचा भरभरून आस्वाद घेते. कधीही न केलेलं नाईटाऊट ती मैञिणी सोबत करते. भिशीला जाऊन आली की ती फ्रेश होते. कधी कधी निराशा दाटून येते, एकटेपणा जाणवतो, राग अनावर होतो. अशावेळी नवरा, मैञिणी सावरतात.

अध्यात्माकडे थोडा कल वाढतो. त्यामुळे मनःशांती मिळून मनःशक्ती वाढते. तिच्या आयुष्यात येणाऱ्या मोकळीकीला ती अशी सामोरी जाते. भरभरून जगते, आनंदी राहते. आणि म्हणूनच ती चाळीशीत छान दिसते. हे सगळं माझ्या चाळीशीच्या आसपासच्या मैञिणींसाठी…….!

©®डॉ. सौ. चित्रा देशपांडे पुणे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here