का आणि कसे केले जाते भूमिपूजन ..वाचा सविस्तर

0
342

आपल्या अखिल जीवनात आपल्या संस्कृतीने कृतज्ञतेच्या संस्काराची किती तरी आवर्तने आपल्यावर लिंपीत केलेली आहेत. त्याच कृतज्ञ संस्काराचा एक भाग म्हणून आज आपला जगाचा पोशिंदा शेतकरी दादा कृषि भूमिपूजन करत आहे. बारा महिने तेरा काळ ज्या मातीत आपण घाम गाळतो त्या मातीच्या औदार्यामुळे आपलं जीवित सुरु आहे त्या मातीच म्हणजेच भूमीच आज पूजन केलं जातं.

वास्तविक हाताने पेरलेले धान्य पोत्याने परत देणारी भूमी ही आपली मातृवत उपकारकर्ती आहे. ती या संपूर्ण विश्वाचे भूक भागवणारी खरी खुरी भूकशामक देवता आहे. तिच्या सृजनशीलतेमुळे आपल्या उपयोगाच अन्नपाणी आपल्याला उपलब्ध होत आणि आपण जगतो. मानव जातीवर तिचे उपकार अनन्य साधारण असे आहेत. आज तीच पूजन करण्यापाठीमागे तिच्या या सगळ्या उपकारक भूमिकांचा आदर करणे तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा साधा सरळ हेतू आपल्या मनी असतो.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तिच्याच कृपेने निर्माण झालेली सामुग्री परत तीलाच अर्पुन आपण तिची पूजा करतो. आपल्यावर अनंत त-हेने उपकार करणा-या उपकारकर्त्या भूमातेची आज आपण पूजा करूयाच पण त्या बरोबरच आपल्या बदललेल्या स्वार्थी व आपमतलबी कृषि विषयक भूमिकांमध्ये थोडा बदल करुन तिच्या संवर्धनाची देखील थोडी काळजी घेऊ या. कमी श्रमात जास्त काही पदरी पाडून घेण्यासाठी आपण तिच्यावर जे नको नकोसे रासायनिक प्रयोग करत गेलो त्यामुळे तिच्या मुळच्या उत्पादक सामर्थ्यावर अतिक्रमण व्हायला लागलं आणि ती नापिक बनत चालली

एका बाजूला माता समजून तिची पूजा करणं आणि दुस-या बाजूला तिच्या प्राकृतिक सौख्याला इजा पोहोचवणं आपल्या वागण्यातील या विरोधाभासाच आत्मवलोकन करुन आपल्या मनातील तिच्याबद्दलचा खरा खुरा पूज्यताभाव वृद्धींगत करू या असे मनापासून वाटते.

संपूर्ण मानवी जीवनाचे फक्त कल्याणच करणारी व आपले सकल जीवन सुजलाम सुफलाम करणा-या या भूमिमातेला शतशः नमन…कोटी कोटी प्रणाम…अनंत कोटी प्रणाम…तिचा सन्मान करा, तिच्या प्रति मनी सदैव कृतज्ञभाव जोपासा, तिचे रक्षण व संवर्धंनाची जबाबदारी घ्या…तर ख-या अर्थांने ती भूमिपूजन ठरेल…

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here