कोरोनाची वाढ कधी थांबणार ; सोलापूर शहरात 38 अहवाल पॉझिटिव्ह ,पाच जणांचा मृत्यू: मत्त्यु दर पोहचला 10 टक्क्यांवर

0
410

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज मंगळवारी  271 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 233  अहवाल निगेटिव्ह आले असून  38 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात  23 पुरुष तर 15  महिलांचा समावेश होतो .आज  47 प्रलंबित अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आज  39  बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.आज 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या   2852 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 282  जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या  1095  इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या  1475 इतकी लक्षणीय आहे.

म्हेत्रे वस्ती (प्रतापनगर) येथे तीन, स्वामी विवेकानंद नगरात दोन, कुमठे येथे तीन, रामदेव नगर (शेळगी) येथे तीन, शाहीर वस्ती (भवानी पेठ), हराळे नगर (मजेरवाडी), कल्याण नगर (होटगी रोड) आणि वसंत नगर याठिकाणी प्रत्येकी दोन रुग्णांची नव्याने भर पडली.

तसेच सम्राट चौक, जम्मा वस्ती, जग्गम वस्ती (अक्‍कलकोट रोड), विजयपूर रोडवरील गरिबी हटाव झोपडपट्टी, विद्यानगर (शेळगी), गुरुवार पेठ, महेश थोबडे नगर, हैदराबाद रोडवरील कमल नगर, शिक्षक सोसायटी, अक्‍कलकोट रोड एमआयडीसी, साखर पेठ, विडी घरकूल, दक्षिण कसबा, संगम नगर (मुळेगाव रोड), राजीव गांधी नगर (भवानी पेठ), सिध्देश्‍वर नगर (नई जिदंगी), एसआरपीएफ क्‍वार्टर, हब्बू वस्ती, अशोक चौकातील सत्यम हॉटेलजवळ प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. 

पाचजणांचा झाला मृत्यू 
दाते गणपतीजवळील राजवाडा संकूल येथील 69 वर्षीय पुरुष, जोडभावी पेठेतील 30 वर्षीय महिला, पद्मानगरातील 65 वर्षीय महिला, जुळे सोलापुरातील गोकूळ नगरातील 78 वर्षीय पुरुषाचा तर महेश थोबडे नगरातील 84 वर्षीय पुरुषाचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here