अमृत महोत्सवी वर्षातच लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला?; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

0
140

अमृत महोत्सवी वर्षातच लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला?; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल


राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत हे कोणतं स्वातंत्र्य आहे. ज्यांच्यामुळे तिरंग्याचं रक्षण होतं. ज्यांच्यामुळे घरावर डीपीवर तिरंगा लावू शकतो, त्या लष्कराची कपात करत असाल तर त्याला काय अर्थ आहे असे म्हणत भाजपाकडून करण्यात आलेल्या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा विविध कार्यक्रमांनी पार पाडला जात आहे. (Central Government) केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षातच (Democracyलोकशाही ही मृतावस्थेत न्यायची का ? असा खडा सवाल (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण सध्याची देशातील स्थितीचा हवाला देत देशात खरोखरच लोकशाही जीवंत राहिली आहे का ? सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सत्तेचा दुरपयोग दिवसेंदिवस वाढत आहे. हे देशाच्या हिताचे नाही पण हुकमशाहीच्या वाटचालीवर असणाऱ्यांना हे काय सांगावे असे म्हणत ठाकरे यांनी केंद्राच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे अमृत महोत्सवी वर्षातच लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल हा कसला अमृत महोत्सव असा जाब त्यांनी सरकारला विचारला आहे.

प्रादेशिक पक्ष संपवायचा प्रयत्न

देशातील मांडणी झाली. संघराज्य आहे. त्यात सर्व राज्य आहे.ही घटक राज्य एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं आहे. हे सर्व राज्य एकत्रं आल्याने त्याला संघराज्य म्हणतात. मग नड्डांना काय म्हणायचं आहे. प्रादेशिक पक्ष संपवायचे म्हणजे त्यांना संघराज्य संपवायचं आहे का. हे संघराज्य नको हे तुमचं मत देशाच्या नागरिकांचं मत आहे का. त्यावर निवडणुका व्हायला हव्यात. आज तुम्ही गादीवर बसलात म्हणून हम करे सो कायदा चाललं आहे. ही लोकशाही नाही. ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाही.

देशातील लोकशाही धोक्यात

राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत हे कोणतं स्वातंत्र्य आहे. ज्यांच्यामुळे तिरंग्याचं रक्षण होतं. ज्यांच्यामुळे घरावर डीपीवर तिरंगा लावू शकतो, त्या लष्कराची कपात करत असाल तर त्याला काय अर्थ आहे असे म्हणत भाजपाकडून करण्यात आलेल्या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.देशात खरोखरच लोकशाही जीवंत राहिली का असा असा सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प्रादेशिक पक्ष संपवायची भाषा बोलली जात आहे. देशात संघराज्य नको हे तुमचे मत असून याला ते जनतेवर का लादता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकावरही हल्लाबोल

सध्या केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार असल्याने मनमामी काभार सुरु आहे. केंद्रीय नेतृत्व हे प्रादेशिक पक्षच संपवून टाकण्याची भाषा करीत आहेत. एकीकडे अमृत महोत्सवी वर्षाच्या नावाखाली विविध उपक्रम घ्यायचे आणि दुसरीकडे ज्यामुळे राज्य एकत्र आले ते संघराज्य मोडीत काढण्याची भाषा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यामुळे निवडणुकांचे कार्यक्रम यांना वाटेल तेव्हा, खातेवाटप यांना वाटेल तेव्हा, सर्वकाही बेभरवश्याचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here