बार्शीत ओला दुष्काळ ; तीन दिवसात पडला 200 मिमी पाऊस; आमदार राऊत भेटणार मुळ्यामंत्र्यांना
बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्यातील जून-जुलै महिन्यातील पावसाची सरासरी ही २३१ मिलिमीटर असून, आत्तापर्यंत ३८२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
२ ऑगस्ट रोजी बार्शी मंडलात ८३.५ मिलिमीटर पावसाची व खांडवी मंडलात ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातत्याने पडणारा पाऊस व जादाच्या पावसामुळे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे, त्याचप्रमाणे उगवून आलेले पिके पिवळी पडत असून पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालय बार्शी येथे तहसीलदार सुनील शेरखाने, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, नायब तहसीलदार संजीवन मुंडे, मंडल अधिकारी, तलाठी कृषी सहाय्यक यांच्यासोबत तातडीची आढावा बैठक घेतली.

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून मंडल अधिकारी, तलाठी व कृषी सहाय्यकांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशा सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीत तालुक्यातील सध्याच्या प्राप्त परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीतील संपूर्ण माहिती देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी करणार आहे.