कोरोनाला हरवून कर्तव्यावर आलेल्या कळंब ठाणे पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वागत
अमर चौंदे
कळंब : कळंब पोलीस ठाण्यातील जवळपास २७ पोलीस कर्मचाऱ्यांना मागील १५ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी नंतर स्पष्ट झाले होते. यापिके २ पोलीस कर्मचार्यानी कोरोनाला अवघ्या काही दिवसातच हरवून कर्तव्यावर पुन्हा रुजू झाले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाण्यात फुले उधळून स्वागत करण्यात आले.


कळंब पोलीस स्टेशन मधील पोलीस जवळपास २७ पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यदरम्यान कोरोनाची लागण झाली होती. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर कळंब शहरात उपचार सुरु होते. आज कोरोनाबाधित २ करचारी पूर्णपणे बरे होऊन पुन्हा कर्तव्यावर रुजू हि झाले आहेत, पुन्हा कोरोनाशी २ हात करण्यास सज्ज झाले आहेत.

या कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाण्यात आगमन झाल्यानंतर त्यांच्यावर फुले उधळुन स्वागत करण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक मनोज पाटील पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दोन्ही पोलीस कर्मचार्यांना गुलाब पुष्प देवुन सत्कार केला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अशोक पवार, उप पोलीस निरीक्षक चैनसिग गुशिंगे , पोलीस नाईक प्रशांत राऊत, अनील तांबडे, नगरसेवक मुस्ताक खुरेशी,किरण टेकाळे, अनिल हजारे, रवी घटपरडे, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
