शिवसेनेचे शिवाजीबापु कांबळे खासदार झाले तेव्हा मोदी पंतप्रधान होते का – खा.ओमराजेंचा सवाल

0
156

शिवसेनेचे शिवाजीबापु कांबळे खासदार झाले तेव्हा मोदी पंतप्रधान होते का – खा.ओमराजेंचा सवाल

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

धाराशिव जिल्हा शिवसेनेचेचा बालेकिल्ला आहे. भाजपवाले मोदी मुळे आम्ही निवडुन आल्याचे सांगतात पण ज्या वेळी बापु कांबळे धाराशिव लोकसभा निवडणुकीत निवडुन आले होते त्यावेळी मोदी पंतप्रधान होते का असा सवाल खा.ओमराजे निंबाळकर यांनी भाजपला विचारला आहे.

धाराशिव शहरातील महेश  देवकते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,माजी नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर व माजी नगराध्यक्ष दत्ता  बंडगर यांच्या उपस्थितीत झाला.

शिवसेना जिल्हा प्रमुख व आ.कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जिल्हयाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी पदासह मंजूर केले. शहरातील आठवडी बाजारासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्या सर्व कामाच्या शिंदे-फडणवीस सरकारने निधी स्थगिती दिली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणीक वर्षांपासून सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच सरकार पाडले गेले,असेही  आमदार पाटील यांनी सांगितले.

 यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय  देशमुख,  विजय  सस्ते,भारत  इंगळे,सतीश सोमाणी, पप्पू मुंडे, सोमनाथ आप्पा गुरव, नितीन शेरखाने, प्रवीण कोकाटे,रवि कोरे आळणीकर,पंकज पाटील,भीमा अण्णा जाधव,सुमित बागल,दिनेश बंडगर,सत्यजित पडवळ,गफुर शेख,अमित उंबरे, अभिजीत देशमुख,सुनील गायकवाड, राकेश सूर्यवंशी, सिद्दिक तांबोळी, सुलतान शेख उपस्थित होते

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here