सावधान: उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन बाल विवाह रोखले

0
256

सावधान: उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन बाल विवाह रोखले

उस्मानाबाद :- गंभीरवाडी आणि उस्मानाबाद येथील सेवालाल कॉलनीत होणारे दोन नियोजित बालविवाह जिल्हा महिला व बालविवाह अधिकारी बी.एच.निपाणीकर यांच्या कार्यवाहीमुळे थांबवण्यात यश ‍आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या कार्यवाहीमध्ये कळंबच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती.व्ही.व्ही. सागळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी. कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वेगवेगळया ठिकाणी गोपनीय पद्धतीने बालविवाह उरकण्याचा प्रयत्न केला जात असतांना ग्राम बाल संरक्षण व वार्ड बाल संरक्षण समितीच्या प्रयत्नाने हे नियोजित बाल विवाह रोखण्यात यश आले आहे.

हे बालविवाह रोखण्यात गंभीरवाडी (ता. कळंब) येथील बाल विवाह प्रतिबंध समिती सदस्या श्रीमती ज्योती सपाटे यांच्या पुढाकाराने हे दोन्ही बाल विवाह वधू व वर यांचे समुपदेशन करुन तसेच त्यांच्याकडून हमीपत्र घेवून थांबविण्यात आले. या कामी सुपरवाईझर श्रीमती.ए.पी.मोहिते, बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विभावरी खुने, समुपदेशक श्रीमती कोमल धनवडे, सामाजिक कार्यकरर्त्या प्रज्ञा बनसोडे, गंभीरवाडीचे ग्रामसेवक व्ही.के.लांडगे,

गंभीरवाडीच्या अंगणवाडी कार्यकर्त्या गंगाबाई देवकर, अर्चना देवकर पोलिस हवालदार श्रीमती. ए.बी.नाईकवाडी व बी.डी.तांबडे, पोलीस पाटील अशोक माने, संतोष देवकर, औदुंबर माने, पांडूरंग गव्हाने, अश्रुबा गाडे, अश्वीनी गव्हाने, बालाजी गुंड व नवनाथ गव्हाने यांच्या प्रयत्नांने हे बालविवाह थांबवण्यात यश मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here