वांगरवाडी ९ महिन्याच्या चिमुरड्याचा खून प्रकरण
निर्दयी आईनेच केली पोटच्या ९ महिन्याच्या बाळाची हत्या ; चोरीचा केला बनाव
गणेश भोळे
बार्शी : बार्शी तालुक्यातील वांगरवाडी येथे चोरीचा बनाव करुन ९ महिन्याच्या पोटच्या गोळ्याचे स्वत:च्या हाताने निर्दयी आईनेच चार्जर वायरने बाळाच्या गळ्याचा घोट घेतल्याचे पोलिसात तपासात उघड झाले आहे आरोपी आई अश्विनी स्वानंद तुपे (वय २३ रा वांगरवाडी ) हि आरोपी असल्याचे निश्पन्न झाले असल्याची माहीती पोलिस उपअधिक्षक डॉ सिध्देश्वर भोरे सपोनि शिवाजी जायपात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली या घटनेत ९ महिन्याचा सार्थक स्वानंद तुपे यांची हत्या झाली आहे .

याबाबत अधिक माहीती की दि २२ ऑगस्ट रोजी गणेश अगमना दिवशी भरदिवसा घरामध्ये घुसून कोणीतरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या अनोळखी व्यक्तीने पाळण्यामध्ये झोपलेल्या नऊ महिन्याच्या चिमुरडयाचा मोबाईल चार्जर वायरने गळा आवळून हत्या केल्याची फिर्याद मयत सार्थक चे चुलते आनंद राजेंद्र तुपे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली होती

याबाबत माहिती अशी की घटनेची गांभिर्य ओळखून सदर गुन्ह्याचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा अत्यंत गुंतागुंतीचा व किचकट स्वरूपाचे असल्याने तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळाचे आजूबाजूचे साक्षीदारकडे चौकशी केली .
यादरम्यान गोपनीय बातमीदार मार्फत एका साक्षीदाराकडे विचारपूस केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले त्याचे हाव भाव बोलणे याबाबत शंका येत होती परंतु यातील साक्षीदार काहीही सांगत नव्हता याबाबत त्याला त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता गुन्हा कोणी केला आहे . याबाबतची माहिती मिळाली परंतु याबाबत या हत्ये पाठीमागचा उद्देश समजून येत नव्हता .
यावेळी त्या बाळाच्या आई आरोपी अश्विनी स्वानंद तुपे त्याच्याकडे चौकशी केली असता मृत बालक हा सारखा रडत असल्याने व किरकिर करत असल्याच्या त्रासाला कंटाळून तिने मोबाईलचार्जर वायर ने गळा आवळून खून केला आहे व आरोपी लिहिणे स्वतःवर काही येऊ नये म्हणून चोरीचा बनाव केला आहे असल्याचे उघड झाले आहे . या तपास कामी उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे
स.पो नि शिवाजी जायपत्रे, सपोफौ. प्रविण जाधव पोह सचिन माने ,राजेंद्र मंगरुळे ,गोरख भोसले ,योगेश मंडलिक, महेश डोंगरे आप्पासाहेब लोहार, तानाजी धिमधिमे, विजय घोगरे, विलास भराटे , धनराज फत्तेपुर, पांडुरंग सगरे, पल्लवी मुलादे व स्थानिक गुन्हे शाखेतील राजू गायकवाड गोरक्षनाथ गांगुर्डे बापू शिंदे लाला राठोड अजय वाघमारे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे अन्वर आतार यांची मदत झाली. आरोपी अश्विनी स्वानंद तुपे हिस पोलिसांनी अटक केली असुन बुधवार दि २६ रोजी कोर्टासमोर हजर करणार आहेत अधिक तपास सपोनि शिवाजी जायपात्रे करित आहे .
असा केला चोरीचा बनाव
स्वताच्या बाळाचे जीवन यात्रा सुरु होण्या अगोदरच जीवन यात्रा संपविणाऱ्या निर्दयी आई अश्विनी हिने बाळ रडत असल्याने किरकिर करत असल्याच्या कारणावरू स्वताच्या हाताने मोबाईल चार्जर वायरने ९ महिन्याच्या निश्पाप बाळाचे गळा आवळला व यानंतर स्वतःच ते मृत बाळ जमिनीवर खाली टाकले व स्वतःवर काही येऊ नये म्हणून अनोळखी मुलाने घरात घुसुन बाळाची हत्या करून गळ्यातील ४ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसुत्र ओडुन नेल्याचा चोरीचा बनाव केला होता .