माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ,सात जणां विरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल

0
193

वैराग/प्रतिनिधी:माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ,सात जणांविरुद्ध वैराग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

उच्चशिक्षित विवाहितेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यामध्ये फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये आण, म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला जात असे पैसे न आल्यास तुला कायमस्वरूपी माहेरी पाठवून देऊ, माहेरी आल्यावर कोणीही न्यायला येत नाही लक्षात आल्यावर फिर्यादी
देवई अमोल पाचपुते वय-28वर्षे धंदा-घरकाम जात-मराठा रा-काष्ठी ता-श्रीगोंदा जि. अहमदनगर सध्या रा. कळंबवाडी त्यांच्या तक्रारीनुसार जणांवर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

फिर्यदिने दिलेल्या जवाबानुसार,फिर्यादी चा विवाह 17/06/2017 रोजी आमचे धर्माप्रमाणे झालेला असुन लग्नामध्ये माझे वडिल यांनी योग्य तो मानपान केलेला आहे. मी लग्नापुर्वी व लग्नानंतर पुण्यामध्ये आयटी कंपनीत नोकरीस होते.मला 30,000/- रु पगार होता. लग्नानंतर माझ्या पगाराची सर्व रक्कम माझे पती माझ्याकडुन घेत होते. व त्यातुनच मला खर्चण्यासाठी पैसे देत होते.

माझ्या लग्नानंतर माझे सासरचे लोकांनी एक वर्षे चांगले सांभाळले त्यानंतर माझा लहान दिर श्रीकांत याला पुण्यामध्ये दुध डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी माझ्या सासरकडील लोकांनी मला माझ्या माहेरून पैसे आणण्यासाठी सांगितले होते. परंतु मी माझ्या आईवडीलांची पैसे देण्याची परिस्थिती नाही. माझ्या आई वडीलांनी लग्नात खुप खर्च केला आहे.असे सांगितले, तेव्हा त्यांनी त्या कारणावरून माझा छळ करण्यास सुरूवात केली.

तसेच सासु सासरे हे आम्ही राहत असलेल्या पुण्यामधील आमच्या घरी सतत येत जात असत, सासू-सासर्‍यांनी दोघांनी माझे पतीस सांगुन व मला सतत मानसिक त्रास देवुन नोकरी सोडण्यास भाग पाडले.त्यानंतर पुढे कोरोणा महामारी व लाँकडाऊनच्या काळात आम्ही सर्वजण आमचे मुळ गावी काष्ठी ता- श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे गेलो. त्याठिकाणी गेल्यानंतर वर्क फ्राँम होम मध्ये माझे पती हे घरी बसुन काम करीत होते. परंतू त्याठिकाणी इंटरनेटची रेंज येत नाही हे कारण सांगुन माझे पती मला गावी ठेवुन पुण्याला निघुन गेले.

त्यादरम्यान सासरकडील लोकांनी मला आमचे गावाकडील गरीबीच्या परिस्थीती वरून अपमानास्पद वागणुक देवु लागले व सतत टोमणे मारू लागले व लाँकडाऊनचे कारण करून मला एकटीला सतत अधुनमधून उपाशी ठेवु लागले व त्या कारणावरून भांडण काढुन माझी व्हीडीओ शुटींग करू लागले. लाँकडाउन संपल्यानंतर मी ही माझे पती सोबत पुणे येथे राहणेस गेले परंतु माझे पती यांनी मला मुलबाळ होणार नाही यासाठी सतत दक्षता घेत असत.

तसेच त्यादरम्यान माझे लहान दिर श्रीकांत याचा आकांक्षा हिचेसोबत विवाह झाला. विवाह झालेनंतर ते दोघे आम्ही पुणे येथे राहत असलेल्या ठिकाणी राहण्यास आले. व त्या जागी त्यांना राहयचे असल्यामुळे त्यांनी माझ्या पतीचे माझ्या विरूध्द कान भरत होते.व ते सर्व मिळुन माझा शारीरीक व मानसिक छळ करत होते.व शेवटी त्यांनी आम्हांला आम्ही राहत असलेल्या फ्लटमधुन बाहेर काढले.

परंतु माझे माझ्यापतीवर खुप प्रेम असल्याने सदरचा सर्व प्रकार मी वेळोवेळी घरी सांगितला परंतु घरच्या लोकांनी माझी समजुत काढुन मला त्याच ठिकाणई नांदण्याचा सल्ला देत होते. व माझे सासरकडील लोक मला रागाला घालवुन माझे बोललेले व्हीडीओ रेकाँर्डींग करून माझ्यावर दबाव टाकत होते. परंतु मी मला नांदायचे असल्यामुळे सदरबाबत कोठेही तक्रार दिली नाही उलट माझे पती मला समुपदेशन केंद्र मानसोपचार तज्ञाकडे घेवुन गेले. व मी उच्चशिक्षीत असतानाही मला मानसिक आजार असल्याचे पुरावे तयार करू लागले.

त्यानंतर दि.18/08/2021 रोजी मला माझे पती आम्ही राहत असलेल्या पुण्यातील घरात सोडुन निघुन गेले. त्यानंतर ते कंपनीत वर्क फ्राँम होम करीत होते. व माझा संपर्क होवु नये याची दक्षता घेत होते.तसेच त्यादरम्यान माझ्या पतीने मला सोडचिट्टीसाठी नोटीस पाठविली तेव्हा मी नाईलाजाने माझ्या माहेरी आले. व मी नोटीसचे उत्तर दिले.त्यावरुन ते सर्वजण दि.24/09/2021 रोजी माझ्या माहेरी आले व तु नोटीसला उत्तर का दिले या कारणावरुन माझे सोबत शिवीगाळी, दमदाटी करुन मारहाण केली तसेच तु आम्हाला पुणे येथे फ्लट घेणेसाठी 10लाख रुपये दे. तरच आम्ही तुला नांदवु असे सांगुन निघुन गेले परंतु माझी नांदण्याची ईच्छा असल्याने मी व माझ्या घरच्यांनी पोलीस ठाणेस तक्रार दिली नाही.

परंतु त्यानंतरही ते लोक मला पैश्याची मागणी करतात. न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देतात म्हणून रोजी वैराग पोलीस ठाणेस येवुन सदरबाबत माझी 1) अमोल अरुण पाचपुते 2) अरुण काशीनाथ पाचपुते 3)दमयंती अरुण पाचपुते 4) राहूल अरुण पाचपुते 5)माधुरी राहूल पाचपुते 6)श्रीकांत अरुण पाचपुते 7) आकांक्षा श्रीकांत पाचपुते सर्व रा.काष्ठी ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचेविरुध्द तक्रार आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here