विखेंकडे महसूल, मुनगंटीवारांकडे वन, तर चंद्रकांतदादांकडे उच्च व तंत्र शिक्षण, शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर

0
60

विखेंकडे महसूल, मुनगंटीवारांकडे वन, तर चंद्रकांतदादांकडे उच्च व तंत्र शिक्षण, शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर


राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

*शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.*

भाजपचे मंत्री :
1) राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
2) सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
3) चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
4) डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
6) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
7) सुरेश खाडे- कामगार
8) रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
9) अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शिंदे गटाचे मंत्री :
1) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
2) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
3) संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
4) संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
5) उदय सामंत- उद्योग
6) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
7) अब्दुल सत्तार- कृषी
8) दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
9) शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here