लढवय्या बाणा असणारे विकासरत्न नेतृत्व – आमदार राजाभाऊ राऊत

0
193

प्रशांत खराडे

लढवय्या बाणा असणारे विकासरत्न नेतृत्व – आमदार राजाभाऊ राऊत

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राजकारणात येण्यासाठी एक तर राजकीय वारसा असावा अथवा एखादा गॉडफादर तरी सोबत असावा लागतो. मात्र राजकीय वारसा नसतानाही जनतेसाठी मनापासून काम करत राजकीय गणिताची जुळवाजुळव करून बार्शीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू करणारे दमदार व लढवय्ये नेतृत्व म्हणजे विकासरत्न आमदार राजेंद्र राऊत.

आमदार राजेंद्र राऊत यांचे नेतृत्व म्हणजे बार्शी शहर व तालुक्यातील जनतेने प्रस्थापितांच्या राजकारणाला शह देण्यासाठी, त्यांची गुंडगिरी, दडपशाही, त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तयार केलेले सामान्य शेतकरी कुटुंबातील एक धाडसी, कणखर, लढवय्ये, विकासाची दूरदृष्टी असलेले व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारे नेतृत्व होय. 1990 च्या दशकात बार्शीला एक लढवय्ये नेतृत्व मिळाले. या नेतृत्वाला घडविताना बार्शी शहर व तालुक्यातील जनतेने त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. जनतेने त्यांच्यातील हा लढवय्या बाणा ओळखला होता, त्या 90 च्या दशकातील बार्शीतील दुष्ट व वाईट अपप्रवृत्तींचाच्या विरोधात लढताना आमदार राजेंद्र राऊत यांना विरोधकांकडून संपविण्याचा चार वेळा प्रयत्न झाला.

त्यांच्यावर प्राणघातक हल्ले केले गेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांच्या आदर्शांवर चालणाऱ्या राजाभाऊंनी प्रत्येक वेळी हा हल्ला परतवून लावून त्या संकटांवर मात केली. त्या दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात लढताना त्यांच्यात पाहिलेला विश्वास जनतेने सार्थ ठरविला व त्यांच्यामागे पूर्णपणे आपली ताकत उभा केली. या ताकदीच्या जोरावरच नगरसेवक, नगराध्यक्ष व दोन वेळेस आमदार असा त्यांचा संघर्षमय व लढवय्या प्रवास आजही सुरूच आहे. आज बार्शी शहर व तालुक्यात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे शांतता नांदत असून येथील वाद-विवाद, तंटे सामोपचाराने व आपापसात विचार विनिमय व संवाद करून त्यांनी मिटविले आहेत.

समाजकारण व राजकारणाची सुरुवात करतानाच माझी जनता, माझा शेतकरी, माझा तळागाळातील सर्वसामान्य नागरिक, समाजातील दीन-दलित अल्पसंख्यांक व अठरापगड जातींना एकत्र करून नेहमी त्यांचा उत्कर्ष कसा होईल व माझा बार्शी तालुका आर्थिक प्रगतीकडे कसा जाईल, याचे स्वप्न त्यांनी सतत पहिले. आज त्यांच्या या स्वप्नांना मूर्तिमंतपने आकार मिळत आहे.

बार्शी शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, माझ्या तालुक्यातील प्रत्येक नागरिक आर्थिक संपन्न होण्यासाठी, तालुक्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी, माझा शेतकरी प्रगतशील होण्यासाठी, माझ्या शहर व तालुक्यातील व्यापार वाढावा व त्यांचे नाव देशभर व साता समुद्रापार लौकिक वाढावा यासाठी आज ते सतत प्रयत्न करीत आहेत. शहर व तालुक्यातील नागरिकांच्या प्राथमिक गरजांच्या सोयी-सुविधा प्राधान्याने पूर्ण करत असतानाच, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला बार्शी उपसासिंचन माध्यमातून पाणी देऊन माझा बार्शी तालुका हरित क्रांती करायचे असे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या प्रयत्नातून तालुक्यात अनेक लघू व मध्यम प्रकल्पांची उभारणी सुरू आहे.


बार्शी शहरातही व्यापार उद्योग वाढावा म्हणून व्यापारी बांधवांना प्रोत्साहन देण्याबरोबरच मोठमोठे कारखाने यावेत व येथील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी एम.आय.डि.सी. उभारणीच्या अंतिम प्रक्रियेसाठी ते प्रयत्न करीत आहेत.

आज त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या बार्शी नगर परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बार्शी शहर व तालुक्याचा चहू बाजूने होत असलेला विकास आज संपूर्ण जिल्हा व तालुका आपल्या डोळ्यांनी पहात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेली व सुरू असलेली विविध विकास कामे पाहून जनता आपल्या लढवय्या नेतृत्वाबद्दल कौतुक व्यक्त करीत आहे.

आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले असून त्यामधून ही त्यांनी न खचता व न थांबता आपला हा 25 वर्षांचा राजकीय प्रवास अठरापगड जाती धर्मांना सोबत घेऊन पुढे चालूच ठेवला आहे. शहर व तालुक्यावर येणारी नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अतिवृष्टी, कोरोना महामारी या काळात त्यांनी जनतेसाठी जनतेत मिसळून त्यांची सुख-दुःखे जाणून घेऊन, यातून त्यांना शासन दरबारी सतत मदत देण्याकरीता, त्याचबरोबर वैयक्तिक रित्या व मित्रपरिवार यांच्या मदतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी जनतेला मदतीचा हात दिला.

बार्शी शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास करताना त्यांनी राज्यातील सर्व नेते मंडळींसोबत सलोख्याचे संबंध जपत आपला स्नेह वाढविला आहे. बार्शी विधानसभा मतदार संघाचा विकास करताना त्यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे साहेब, नगर विकास मंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब आदी नेत्यांच्या संपर्कात राहून आपल्या मतदार संघात विविध विकास कामांकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अशा या लढवय्या व विकासाची दूरदृष्टी ठेवून सतत कार्यमग्न असणाऱ्या विकासरत्न नेते आमदार राजाभाऊ राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here