चोरून विवाहितेचा काढला व्हीडिओ : मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल.लैंगिक अत्याचार ही केले

0
73839

चोरून विवाहितेचा काढला व्हीडिओ : मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल.लैंगिक अत्याचार ही केले

मोहोळ : अंघोळ करताना चोरून मोबाईलवर काढलेली चित्रफीत सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ३० वर्षीय विवाहित युवतीवर आठ महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवार १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकरणी एका इसमावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैनुद्दीन लाला शेख (रा. सौंदणे ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या बाबत मोहोळ पोलिसनाकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील तांबोळे येथील एक विवाहिता अंघोळ करत असताना, जैनुद्दीन लाला शेख याने लपून मोबाईलमध्ये विडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्याने जानेवारी २०२० मध्ये सदरचा विडीओ त्या विवाहितेला दाखवून तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने संभोग केला होता.

त्यानंतरही त्याने वेळोवेळी सदर विवाहितेस तिचा नवरा व लहान मुलाला जिवे मारण्याची धमकी देवून तब्बल आठ महिने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. त्याचा नेहमीचा त्रास सहन न झाल्याने पिडीतेने बुधवार १९ ऑगस्ट रोजी धाडस करुन मोहोळ पोलिसात धाव घेऊन आपली आपबिती कथन केली.

या प्रकरणी सदर पीडितेने मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार जैनुद्दीन शेख याच्या विरोधात बलात्काराचा सह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे हे करीत आहेत. या घटनेमुळे तांबोळे व सौंदणे सह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here