खूपच चिंताजनक: देशात चोवीस तासात 27114 कोरोना रुग्ण सापडले; 419 मृत्यू

0
187

ग्लोबल न्यूज – देशात कोरोना रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस नकोसा विक्रम होत असून गेल्या 24 तासांत 27,114 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. याचबरोबर देशातील एकूण रूग्णांची संख्या 8,20,916 इतकी झाली आहे.

मागील 24 तासांत झालेली रुग्णांची वाढ ही आजवरची सर्वात मोठी वाढ आहे. शुक्रवारी (दि.9) 26,506 रूग्णांची नोंद झाली होती. तर काल एका दिवसात 27,114 नवे रूग्ण आढळले आहेत. देशातील एकूण 8,20,916 कोरोना बाधितांपैकी 2,83,407 सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 5,15,386 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गेल्या 24 तासांत 519 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील मृतांची संख्या 22,123 वर जाऊन पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात आजवर 2,83,461 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तमिळनाडू 1,60,261, दिल्ली 1,09,140 रुग्ण सापडले असून या तीन राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

देशात चाचणीचे प्रमाण वाढले असून शुक्रवारी (दि.10) 2,82,511 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आजवर 1,13,07,002 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएमआर याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून देशात दिवसाला 20 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील पाच दिवसांपासून देशात 25 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चार दिवसांत देशात एक लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दर तासांला एक हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here