वैराग : एक ट्रॅक्टर वाळू भरुन हिंगणी (पा) गांवाकडे जात आहे अशी बातमी मिळाल्यामुळे, वैराग पोलिस माळवस्ती येथे जाऊन थांबले असता, मिळालेल्या बातमीनुसार दि. १४ एप्रिल २०२२ रोजी रात्री अकरा वाजता एक ट्रॅक्टर येताना दिसला.
त्यास थांबवून तपासणी केली असता, ट्रॅक्टरच्या पाठीमागे जोडलेल्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू भोगावती नदीपात्रातून विना परवाना चोरुन भरुन आणलेली दिसली. त्यावेळी एक इसम ट्रॅक्टरमधून उडी टाकून पळून गेला.

पोलिसांनी सदर ट्रॅक्टर क्र. एमएच-२२-एडी-०४३९, त्याला जोडलेली दोन चाकी डंपींग ट्रॉली व त्यामधील वाळू मिळून चार लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी ट्रॅक्टर चालक किशोर बाळासाहेब काशीद, (वय ३१) व पळून गेलेला इसम गणेश सुभाष माने (वय २६), दोघे रा. पिंपरी (पा), ता. बार्शी या दोघांविरुध्द भा.द.वि. कलम ३७९, ३४ पर्यावरण संरक्षण अधिनियम ९ व १५ प्रमाणे वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.