वैराग : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला 5 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त

0
199

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला 5 लाख7 हजाराचा मुद्देमाल जप्त.

वैराग/प्रतिनिधी:

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नायकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक वैराग हद्दीत पेट्रोलिंग करत होते. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील मोहोळ चौकात आलो, अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करताना एक टेम्पो विनापरवाना वाळू वाहतूक करताना आढळला. त्यामुळे पोलिसांनी एक जणांवर गुन्हा दाखल करून पाच लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल संदेश पवार यांच्या फिर्यादीनुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मोहोळ रोडवरुन टेम्पो अवैद्यरित्या वाळू घेवून वैरागच्या दिशेने येत असल्याची बातमी मिळाल्याने वैराग पोलिसांच्या मदत घेऊन नकाते मंगल कार्यालयसमोर जावून थांबलो असता मोहोळवरुन वैरागच्या दिशेने एक टेम्पो येताना दिसला त्याचा आम्हाला संशय आल्याने त्यास बँटरीच्या प्रकाशाचा ईशारा करुन थांबण्यास सांगितले असता त्या ठिकाणी थांबला. वेळ 00/15 वा. ची होती. थांबल्यानंतर सदर टेम्पोमधील चालकास त्याला त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव रामचंद्र जगन्नाथ पवार वय 32 वर्षे रा. भोईंरे ता. मोहोळ असे असल्याचे सांगितले. सदर टेम्पोमध्ये मागील बाजूस बँटरीच्या सहाय्याने पाहणी केली असता सदर टेम्पो वाळूने भरलेला दिसला. सदर वाळूबाबत चालकाकडे परवाना असलेबाबत विचारणा केली असता त्याने कोणताही वाळू वाहतूकीबाबतचा परवाना न दाखविल्याने तसेच सदरचा माल सिना नदी पात्रातून उपसा करुन घेवून आला असल्याचे सांगितले. म्हणून सदरचा टेम्पो पुढील कार्यवाही करिता ताब्यात घेतला.

1) 5,00,000/- रु. कि. चा एक पिवळ्या पांढ-या रंगाचा बिगर नंबरचा टाटा कंपनीचा 608 माँडेलचा टेम्पो असा असलेला जु.वा. कि. अं. 2) 7,000/- रु. एक ब्रास वाऴु कि अं असे एकुण 5,07,000/- रु येणेप्रमाणे यात नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल (वाहन) ताब्यात घेवून वैराग पोलीस स्टेशन मध्ये आणून लावला आहे. ईसम नामे रामचंद्र जगन्नाथ पवार वय 32 वर्षे रा. भोईंरे ता. मोहोळ यांनी शासनाचा कसल्याही प्रकारचा पास परवाना न घेता अगर राँयल्टी न भरता, पर्यावरणाचा -हास होत आहे हे माहीत असुन सुध्दा सिना नदीपात्रातून चोरून वाऴू उपसा करून स्वतःचे फायदेसाठी सदर टेम्पोमध्ये भरुन घेवून जात असतांना मिळून आला आहे, म्हणुन त्यांचे विरूध्द भा.द.वि. कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 9व 15प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here