वैराग: क्रांतीसुर्य केसरी किताब सिकंदर शेख यांनी तर संतनाथ केसरीचा मानकरी ठरला विशाल बनकर

0
141

वैराग: क्रांतीसुर्य केसरी किताब सिकंदर शेख यांनी तर संतनाथ केसरीचा मानकरी ठरला विशाल बनकर

प्रतिनिधी वैराग
येथे श्री संतनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या तीन कुस्ती फडावर आंतरराष्ट्रीय व नामवंत कुस्तीपटूनी कुस्तीचा आखाडा गाजवला . प्रथम क्रमांक २ लाख एकाव्वान हजार रुपयांचे रोख बक्षीस, जिंकून गंगावेस कोल्हापूरच्या सिकंदर शेख मल्लाने क्रांतीसुर्य केसरी किताब पटकावला. तर संतनाथ केसरी चा किताब पै विशाल बनकर तर संजीव भुमकर आखाड्याचा मानकरी पैलवान अभिषेक अंधारे ठरला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यात्रेत झालेल्या या तीन कुस्ती आखाड्यात ४०० ते ५०० मल्लांना सुमारे ८ ते ९ लाख रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत कुस्त्यांचा आखाड्यात कुस्त्या सुरू होत्या.

दुपारी दोन वाजता कुस्तीविरांची मिरवणूक होऊन कुस्ती तीन वेगवेगळ्या ठिकाणी फडांचे उद्घाटन करण्यात आले .
यावेळी क्रांतिसूर्य केसरी मैदानाचे उद्घाटन माजी आ.धनाजी साठे यांचे हस्ते करण्यात आले . आ .राजेंद्र राऊत, माजी जि.प. सदस्य संतोष निंबाळकर, माजी सभापती लक्ष्मण संकपाळ, जि.प. सदस्य मदन दराडे, केशव घोगरे, सुरेश गुंड, विनायक देशमुख, मोहन घोडके, नगरसेवक बाबासाहेब रेड्डी, सुखदेव जगताप, संजय आवारे, प्रमोद वाघमोडे, प्रंशात कथले , नगरसेवक श्रीशैल्य भालशंकर , नगरसेवक शाहुराजे निंबाळकर,अनिल डिसले, सरंपच तात्यासाहेब करंडे, नाना धायगुडे, आदी मान्यवर उपस्थित होते .

संतनाथ केसरी कुस्त्यांच्या मैदानाचे उदघाटन माजी मंत्री दिलीप सोपल यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी , भाऊसाहेब आंधळकर , अरूण कापसे, माजी सभापती मकरंद निंबाळकर ,संयोजक नंदकुमार पांढरमिसे , आर्यन सोपल , दीपक आंधकळर , नंदकुमार काशीद , भास्कर काशीद ,श्रीमंत थोरात , अरुण सावंत, संजय येळणे , सागर गावसाने , विनोद वाघमारे , मनिष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .

तर तिसऱ्या ठिकाणी स्व धनाजी भूमकर यांच्या आखाडयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी माजी नगरसेवक नाना वाणी , माजी उपसरपंच संजय भुमकर , भूषण भुमकर ,मुन्ना भुमकर , बाळासाहेब भुमकर आदी मान्यवर उपस्थित होते .

क्रांतिसूर्य केसरी ‘किताब पै .सिकंदर शेख विरुद्ध पै .भारत मदने यामध्ये पै सिकंदर शेख एकलंगी डावावर विजयी
झाला . दोन लाख एकाव्वण हजार रोख रक्कम व दोन किलो चांदीची गदा मानकरी ठरला.
तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै .महारुद्र काळे विरुद्ध पै संतोष जगताप यांची बरोबरी लढत झाली त्यांना एक लाख रुपयाचे पारितोषिक मिळालं.

संतनाथ केसरी किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी पै . विशाल बनकर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै .अक्षय शिंदे यांच्यात लढत झाली .यात उपमहाराष्ट्र केसरी पै .विशाल बनकर याने संतनाथ केसरी ‘किताब पाठविला .पै विशाल बनकर याला दोन लाख रुपये रोख व चांदीची गदा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली .

धनजी भूमकर आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूर येथील पैलवान संदिपान कानेटकर विरुद्ध पै अभिषेक अंधारे यांच्यात झाली. यात अभिषेक अंधारे याने विजय मिळवला .पै अभिषेक अंधारे याला ३१००० / – रुपये रोख इनाम देण्यात आले .

स्पर्धेसाठी सोलापूर , कोल्हापूर , उस्मानाबाद , पुणे , सातारा जिल्ह्यातील मल्ल आले होते. तीन ही कुस्त्यांच्या मैदानावर पडत्या पावसातही कुस्ती पाहण्यासाठी शौकिकांनी गर्दी केली होती .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here