लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी उमेश चौहान तर लायनेसचीधुरा डॉ़ प्रज्ञा हाजगुडे यांच्याकडे
बार्शी: बार्शीच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व युवकांचा क्लब म्हणून ओळख असलेल्या लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी उमेश चौहान सचिवपदी डॉ़ योगेश कुलकर्णी यांची तर लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ़ प्रज्ञा हाजगुडे यांची व सचिवपदी विद्या काळे यांची निवड करण्यात आली आहे़.

यंदा कोरोनामुळे पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम न घेता आॅनलाईन शपथ देण्यात आली़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रीकगर्व्हनर रविंद्र देशपांडे, झोनल चेअरमन रविप्रकाश
बजाज,मावळते अध्यक्ष अमित इंगोले, सचिव महावीर कदम,लायनेसच्याडिस्ट्रीक प्रेसीडेंट वैभवी बुडूख हे उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी गिरीष मालपाणी हे होते़ २१ जणांच्या नवीन
कार्यकारिणीत खनिजदार म्हणून शंभूलाल भानूशाली, प्रथम उपाध्यक्ष म्हणून अजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे़ तर लायनेसच्या पदाधिकारी म्हणून डॉ. गीतांंजलीपाटील व प्रथम उपाध्यक्ष म्हणून शितल परमार यांना संधी देण्यात आली आहे.

यावर्षी कोरोनामुळे ऑनलाइन व्याख्यान तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यावर आमचा भर1असल्याचे चौहान यांनी सांगितले