उजनी धरणाची 75 टक्केकडे वाटचाल , दौंड आवक १० हजार 833 क्युसेक

0
681

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण हळूहळू भरत असून २१आँगस्ट रोजी सकाळी ते ६८ टक्के भरले आहे. दौंडची आवक १० हजार ८३३ क्युसेक इतकी कमी झाली आहे.

पुणे बंडगार्डन विसर्ग १२ हजार क्युसेक आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी झाले असून ३४०० क्युसेक विसर्ग आहे. मात्र मुळशी धरण भरल्याने यातून साडेसहा हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भीमा खोर्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा उजनीत येणारी पाण्याची आवक ही मंदावली आहे. धरण पावसाळ्या ८० दिवसात ६८ टक्के भरले आहे.

उजनी धरण दैनंदिन पाणीसाठा
दिनांक – 21/08/2020.
वेळ – सकाळी 6 वाजता.

पाणीपातळी – 495.240 मी.
एकूण पाणीसाठा — 99.62 टी.एम.सी.
उपयुक्त पाणीसाठा — 35.96 टी.एम.सी.
टक्केवारी — 67.12 %.

आवक विसर्ग मापन केंद्र, दौंड
आवक विसर्ग — 10833 क्युसेक.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here