पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा प्रवाह कायम असल्याने उजनी धरणातील पाणी साठा सायंकाळी 46 टक्के इतका झाला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारा विसर्ग 13 हजार पर्यंत कमी केला आहे.

उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह रविवारी सायंकाळी 6 वाजता बंडगार्डन ( पुणे ) येथे 18221 क्यूसेक्स होता तर दौंड येथे हाच प्रवाह 29 हजार 289 क्यूसेक्स इतका आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. सकाळी उजणीची पातळी 42.23 टक्के होती ती वाढून सायंकाळी 46.13 इतकी झाली आहे.रात्रीत उजनी 50 टक्के पार करेल असे दिसून येत आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी दुपारी साडे तीन वाजता 23 हजार तर सायंकाळी 6 वाजता 13 हजार 164 क्यूसेक्स एवढे कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नीरा नदीची पूरस्थिती सध्या तरी टळलेली आहे.