बार्शी : दोन लाख रुपये खंडणीची मागणी करुन धमकी दिल्याच्या तक्रारीवरुन प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे व इतर तीन जणांविरुध्द वैराग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शीतील सूरज श्रीपती शेळके (वय ३१), रा. अध्यापक कॉलनी, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माझ्या मालकीची ट्रक क्र. एमएच-०६-एक्यू-९२९६ मध्ये ट्रक ड्रायव्हर दत्ता वाघमारे हा दि. १८ एप्रिल २०२२ रोजी गोडेश्वर तामर्डी ता. मंगळवेढा येथून, वाळू भरुन बीडकडे जात असताना, रात्री ९ चे सुमारास मौजे मानेगांव, दडशींगे फाटा येथे संजीवनी बारंगुळे, पत्रकार योगेश लोखंडे, सोनाली गायकवाड, दिक्षा शिंदे यांनी माझा ट्रक अडवून, माझेकडे २ लाख रुपये खंडणीची मागणी केली.

आणि खंडणी न दिल्यास माझ्याविरुध्द अॅट्रासिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगून भितीपोटी माझेजवळ असलेले दहा हजार रुपये त्यांना दिले.
सूरज शेळके यांच्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात भा.दं.सं. १८६० कलम ३४,३४१,३८४,३८५,३८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.