पृथ्वी माझे अंथरुण तर आकाश हे पांघरुण म्हणत तुकाराम महाराजांची अखंड विठ्ठल साधना सुरु होती- जयवंत बोधले महाराज

0
53

दिनांक : १८ऑगस्ट; शुक्रवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.

पृथ्वी माझे अंथरुण तर आकाश हे पांघरुण म्हणत तुकाराम महाराजांची अखंड विठ्ठल साधना सुरु होती- जयवंत बोधले महाराज

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: संत तुकाराम महाराजांनी देहू या आपल्या गावच्या भगवान पांडुरंगाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, वेद, शास्त्रे अशा विविध ग्रंथांच्या साधनेत तुकाराम महाराजांचा दिवस जात होता. संत तुकाराम महाराजांचे वचनच आपल्याला दिसून येते-
आम्ही नामाचे चिंतन।
रामकृष्ण नारायण।
तुका म्हणे क्षण खाता।
जेविता न सको।

आता मला सतत रामकृष्णहरि शिवाय काहीच सुचत नाही. खाण्यापिण्याचे सुद्धा मला भाग राहत नाही.
पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी। अशी तुकाराम महाराजांची अवस्था झाली आहे. असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले प्रवचनमालेच्या २१व्या दिवशी निरुपण करतात.
आम्ही नामाचे धारक।
नेनो प्रकार अनेक।
सर्व भावे एक।
विठ्ठलची प्रमाण।

आता मी नामाची कास धरली आहे. तेव्हा, मला कोणीही यापासून परावृत्त करु शकत नाही. सर्व भावाने मी फक्त विठ्ठलालाच भजतो आहे.

एक धरिला चित्ती।
आम्ही रखुमाईचा पती। माझ्या चित्ताने केवळ त्या लक्ष्मीवरालाच धारण केले आहे. संत तुकाराम महाराज दररोज सकाळी गावाबाहेर जाऊन डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात एकांतात भजन करीत होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी हे सुस्वरे आळवती। संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला पाहुणे म्हणून जवळीक असलेले हे वृक्ष, पशु, पक्षी आहेत. आता मला याशिवाय दूसरे सोयरे नाहीत. अशी भावना झाल्याने-
सदा नाम घोष करु हरिकथा।तेणे सदा चित्ता समाधान।
या नामानेच ख-या अर्थाचे समाधान मला मिळते आहे. हे सर्व वातावरण माझ्या साधनेला अनुकूल आहे. म्हणून मी डोंगरावर येऊन एकांतात भजन करतो.

ही पृथ्वी माझे अंथरुण आहे. तर पांघरुण हे आकाश मंडप आहे. तुकाराम महाराजांची अखंड साधना सुरु आहे. या साधनेत ४ प्रकारचे दोष येऊ शकतात, असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.
१) लय – निद्रा किंवा आळस येण्याची शक्यता आहे.
२) विक्षेप – अन्य विचार मनात येऊ शकतो.
३) कशाय – कल्पनाविलासात रमणे.
४) रसास्वाद – एकाच विषयाची कायमस्वरुपी आवड असणे.

एके दिवशी जिजाई तुकाराम महाराजांना नेहमीप्रमाणे जेवू घालण्यासाठी डोंगरावर जातात. डोंगरावरची वाट फारशी व्यवस्थित नसल्याने त्यांच्या पायात एक मोठा काटा घुसला. काटा लागल्याने त्या फार विव्हळत होत्या. पांडुरंग परमात्मा हे सर्व पाहत असतो. पण, जिजाईने त्या पांडुरंगाचे नाव तोंडातून काढलेच नाही. पांडुरंगाने स्वत: गुराख्याचे बालरुप धारण करुन जावे. जिजाईचे पाय हातात घ्यावे आणि तो काटा हळूवारपणे काढावा. परंतु, नंतर जिजाईंच्या मनात शंका येते हा पांडुरंगच तर नाही ना… तेव्हा लगेच पांडुरंग परमात्मा समोर उभे राहतात. पांडुरंगाचे आणि जिजाईचे जरा वाकडेच होते. तेव्हा, जिजाई पांडुरंगाकडे पाहत नाहीत.

दुसरीकडे पाहता पण, तिथेही पांडुरंग दिसू लागतो. डोळे मिटतात तर आतही पांडुरंगच दिसू लागतो. शेवटी दोघेही डोंगरावर चढून तुकाराम महाराजांच्या जवळ जातात. पांडुरंग परमात्मा व तुकाराम महाराज दोघे मिळून जेवण करतात. याचे सर्व कथावर्णन गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज अतिशय गोड करतात. श्रोते मोठे भावूक होऊन ते ऐकत होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here