ट्रक-कारची समोरासमोर धडक ; पती-पत्नी जागीच ठार ; नातवाला घेऊन निघाले होते टेंभुर्णीकडे
टेंभुर्णीजवळ आठ किलोमीटरवर असलेल्या दगड अकोले पाठी जवळ झालेल्या माल ट्रक व अल्टोकारच्या धडकेत टेंभुर्णी येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. तर त्यांचा नातू जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

ही घटना आज गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. तर गोरख मारुती माने वय 55 व ताई गोरख माने वय 46 अशी अपघातात पावलेल्या पती-पत्नी आहेत तर नातू अनमोल शांतीलाल माने वय वर्ष 2 हा बचावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गोरख मारुती माने व त्यांची पत्नी ताई गोरख माने हे दोघे आपल्या आल्टो कार एम एच 09 ए. बी 7254 या गाडीने त्यांचा पंढरपूर मध्ये असलेला नातू अनमोल याला घेऊन आपल्या टेंभूर्णी गावी अनमोलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंढरपूर हून टेंभूर्णी कडे घेऊन निघाले होते.

दुपारी चार वाजणेचे सुमारास दगड अकोले बस थांब्याजवळ आली असताना टेंभुर्णीहून पंढरपूरकडे येणारा मालट्रक क्रमांक एम एच आर 3303 ने अल्टो कारला जोरात धडक दिली. अनमोलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोरख माने व ताई माने या पंढरपूर येथे नातवाला आणण्यासाठी गेले होते. अनमोलला पंढरपूरहून घेऊन टेंभुर्णीकडे येत असताना वाटेतच दगड अकोले या ठिकाणी माने पती-पत्नीवर काळाने घाला घातला. यात दोघांचा जीव गेला. व नातू अनमोल चा वाढदिवस साजरा करण्याची माने पती-पत्नीची इच्छा अपुरी राहिली. या घटनेने टेंभुर्णी परिसरात व्यक्त होत आहे.
(स्रोत-सुराज्य डिजिटल)