वैराग येथील नवीन मराठी विद्यालय पोलीस स्टेशन यांच्या वतीने तिरंगा पदयात्रा
प्रतिनिधी वैराग : नवीन मराठी प्राथमिक विद्यालय व वैराग पोलीस स्टेशन उच्च माध्यमिक माध्यमिक आश्रम शाळा यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या ७५ व्याअमृत महोत्सवानिमित्त आयोजित तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती.

या तिरंगा पदयात्रेचे उद्घाटन जय जगदंबा संस्थेचे अध्यक्ष डॉ कपिल कोरके ,पोलीस निरीक्षक विनय बहिर डॅा.अमिता कोरके ,श्री.सिराजखाँ पठाण यांनी केले .


तसेच या तिरंगा पदयात्रेचे नियोजन नविन मराठीच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील, पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक श्री.महारुद्र परजने गोपनीय श्री.सचिन मुंडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शाखाप्रमुख तात्यासाहेब घावटे मुख्याध्यापक खंडेराया घोडके,स्वरूप सोनवणे ,शुभांगी मोहिते यांनी केले होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त सोमवारी ३५० फुट तिरंग्या सह रॅली निघत सकाळी आठ वाजता नविन मराठी प्राथमिक विद्यालय पंचशिलनगर वैराग पासून सुरुवात करत ते छत्रपती शिवाजी चौक, गांधी चौक , या ठिकाणी ही रॅली आली त्यानंतर रॅलीमध्ये लेझीम ढोल-ताशांच्या पथकात भारतमातेच्या घोषणा देत बॅन्जो मुळे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी माजी आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर ,अंबिका कुटीर शाखा आर्ट ऑफ लिविंग, बाळासाहेब पांढरमिसे वैराग फोटोग्राफर असोशियन चे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. सदर पदयात्रेचा समारोप गांधी चौक वैराग येथे राष्ट्रगीत घेऊन करण्यात आला, ही पदयात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वप्निल तुपे, रोहन गडसिंग ,मुख्याध्यापिका वैशाली पाटील ,गोपनीय सचिन मुंडे,संदिप पाटील यांनी परिश्रम घेतले.
