वृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन
बार्शी: शिवजयंतीचे औचित्य साधुन बार्शी येथे वृक्ष संवर्धन समिती च्या वतीने गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.बाग फुलविणे सृजनाचा अविष्कार, सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरिक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरित्या फुलवता येते.

त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनिय असतो हाच उद्देश मनात ठेवुन
घरात बाग फुलविणारयांचे कौतुक करावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यांच्यापासून प्रेरणा घेउन शहरात निसर्गाचे रक्षण तसेच संवर्धन व्हावे व वृक्ष चळवळ वाढीस लागावी या उद्देशाने वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या वतीने उत्कृष्ट गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेच आयोजन या वर्षी ही करण्यात आले आहे अशी माहिती वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी दिली.

ही स्पर्धा दोन गटात होणार आहे गच्चीवरील स्पर्धा तसेच घरासमोरील रिकाम्या जागेतील परसबाग स्पर्धा. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धकांची नाव नोंदनी दिनांक १५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ या दरम्यान करण्यात येईल तसेच दिनांक १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२२ याकाळात नावनोंदणी केलेल्या बागप्रेमींच्या घरी
परिक्षकांची टीम बागेची पाहणी करण्याकरीता येणार आहेत.या मधे प्रवेश हा विनामुल्य आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तसेच प्रत्तेक स्पर्धकाला प्रमाणपत्र देवुन सर्वाचा सन्मान करण्यात येणार आहे.
ज्या स्पर्धकांना सहभागी होयचे आहे अशा स्पर्धकांनी खाली दिलेल्या नंबरवर नावनोंदणी करायची आहे. नावनोंदणी करीता मोबाईल नंबर उमेश नलवडे(9689353032) राणादेशमुख(9921641856)अमृत खेडकर (9527360355)राहुल तावरे(8329189479)डॉ.प्रविन मिरगने(99708 4909)डॉ.विजयसिंह पवार(8983300467)
डॉ.विनायक हागरे(9405364861)
चारुदत्त जगताप(9763217374)राहुल काळे (9763466381)संदिप पवार (8668731920)उदय पोतदार(9637521010)
नाव नोंदनीकरते समयी तुमच्या बागेचा एक चांगला फोटो पाठविने आवश्यक.