कोरोना नियमांची पायमल्ली; बार्शीतील बड्या व्यापाऱ्याचे इलेक्ट्रॉनिक्स दुकान महिन्यासाठी सील

0
389

स्वतःही मास्क वापरत नव्हता अन गिऱ्हाईकांना ही नव्हता मास्क; बार्शीतील मोठा व्यापारी कपूरबा इलेक्ट्रॉनिक्स दुकान महिन्यासाठी सील

बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना वाढीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने व्यापारी व नागरिकांना सूचना करून देखील त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गुरुवारी सायंकाळी शहरातील सोमवार पेठेतील कपूरबा इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालकाने स्वतः मास्क वापरले नाही तसेच विना मास्क असलेल्या ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश दिला ,तसेच दुकानांमध्ये गिर्हाईकांना सॅनिटायझर देखील उपलब्ध करून दिले नाही अशी माहिती मिळाली.

त्यानुसार आमच्या पोलीस पथकाला कपुरबा इलेक्टॉनिक्समध्ये कोरोना नियमाचे पालन करत नसल्याचे आढळुन आल्याने हि कारवाई करण्यात आल्याचे सांगत तसेच यापुर्वीही या दुकानावर कोरोना नियमाचे पालन न केल्याने एक गुन्हा दाखल आल्याची माहीती पो. नि संतोष गिरीगोसावी यांनी दिली.यावेळी मोठ्या संख्येनी व्यापारी जमले होते .

म्हणून संबंधित दुकानाच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये आज सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.व हे दुकान महिनाभरासाठी सील केले आहे.

यापूर्वी देखील लॉकडाऊन दरम्यान याच दुकानदाराने जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.


संबंधित दुकानदाराने दुसऱ्या वेळेस हा गुन्हा केलेला असल्याने सदरचे दुकान हे पोलिसांनी 30 दिवसासाठी सील केले आहे.स्वतः शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई मुळे व्यापारीआणिi नागरिकांना शिस्त लागेल असे बोलले जात आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here