बार्शी ;
घारी ता.बार्शी येथील बस स्थानकावरील पान टपरीच्या अंधारात चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या तिन संशईतांना पांगरी पोलिसांनी अटक केल्याचा प्रकार मध्यरात्री घडला.
धनाजी सरदार शिंदे ,वय 28वर्ष, विलास साहेबराव शिंदे वय 22 वर्ष,दोघे रा. मोहा,ता. कळंब जि.उस्मानाबाद व खेमा गणा काळे वय 34 वर्षे रा ढोकी ता.जि.उस्मानाबाद अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

विनोद बागंर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सपोनि सुधीर तोरडमल ,यांचे सोबत चेकींग व डिव्हीजन नाईटराऊड ड्युटी सुरू असताना रात्रौ 01.00 वा. चे सुमारास घारी ता.बार्शी येथील बस थांब्या जवळील पान टपरीचे आडोशाला तीन इसम संशयास्पद रीत्या अंधारात आपले अस्तीत्व लपवुन बसलेचे जाणवले. त्यांचा संशय आल्याने आम्ही आमच्या जवळील बँटरीच्या उजेडात बस थांब्या जवळील पान टपरीचे पाठीमागे गेलो. त्यावेळी सदर तीन इसम आम्हास पाहुन पळुन जावु लागले तेंव्हा सोबतचे स्टाफने मिऴुण त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले
त्यानंतर त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्त्याबाबत विचारणा केली. सदर ठिकाणी बस थांब्याच्या शेजारी पानटपरीचे आडोशास अंधारात बसण्याचे कारण विचारता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली.

ते तेथे अंधाराचा फायदा घेऊन आपले अस्तित्व लपवुन मालाविषयी गुन्हा करण्याच्या ईराद्याने बसले असल्याची माझी खात्री झाली. अंधाराचा फायदा घेउन आपले अस्तित्व लपवुन मालाविषयी गुन्हा करण्याच्या ईराद्याने संशयितरीत्या लपुन बसलेल्या अवस्थेत मिळुण आल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.