पुतण्याला दिली जीवे मारण्याची धमकी; सावकार चुलत्यावर गुन्हा दाखल

0
428

येथील भवानी पेठमधील वडिलोपार्जित बिल्डींगमधील डुप्लीकेट चावीने कुलुप उघडुन पिता -पुत्राने मिळुन पुतण्याचे खोलीतील प्रापंचिक साहित्य बाहेर काढले. याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या पुतण्यास तु या घरात रहायचे नाही, तुझा काही संबंध नाही. तु इथे राहीलास तर तुला आम्ही जीवे मारून टाकु अशी धमकी दिल्याप्रकरणी पुतण्या विशाल विलास गुगळे याने दिलेल्या फिर्यादीवरून चुलते अमृतलाल चांदमल गुगळे व चुलत भाऊ अतुल अमृतलाल गुगळे ( रा.३८५३ भवानीपेठ, बार्शी ) या दोघांविरुद्ध बार्शी शहर पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

विशाल गुगळे यांनी फिर्यादीत म्हटले की गुगळे यांचा सराफ व्यापार असुन मागील १० महीन्यापूर्वी फिर्यादी विशाल यांचे वडील विलास गुगळे हयात असताना जागा वाटपासंबधी तक्रारी झाल्या होत्या. त्यावेळी वडीलांच्या सांगणे वरुन तक्रार न करता जैन मंदिर येथील बंगल्यात राहण्यास गेले. त्यानंतर मागील दोन महीन्यापुर्वी विशाल याचे वडील विलास गुगळे यांचे निधन झाले. त्यानंतर विशाल याने चुलते अमृतलाल यांना जागा वाटुन दया. अशी मागणी केल्यानंतर तक्रारी वाढल्या. दरम्यान सदर भवानी पेठ येथील खोलीत वडीलांसह विशाल याचे प्रापंचिक साहीत्य असल्याने खोलीस कुलुप लावले होते. तसेच येथे अधून मधून येऊन ते राहत होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दि. ३ मे रोजी सकाळी ११.३० वा. अमृतलाल गुगळे यांच्या गाडीवरील ड्रायव्हरने भवानी पेठ येथील खोलीतील साहीत्य गाडीत भरून विशाल यांच्या घरी नेऊन टाकले. याबाबत ड्रायव्हर प्रदिप तिकटे यास विचारले असता त्याने सांगितले की अमृतलाल गुगळे व अतुल गुगळे या दोघांनी सदर रूमचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडुन आतील प्रापंचिक साहीत्य बाहेर काढुन गाडीत भरून हे साहीत्य जैन मंदीराजवळ विशाल याचे घरी नेवून दे असे सांगितले त्यांनंतर विशाल यान
भवानी पेठ येथील खोली जाऊन पाहीले असता खोलीचे कुलुप लावलेले होते . यावेळी विशाल याने कुलुप उघडुन पाहीले असता इतर साहीत्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यावेळी चुलते अमृतलाल गुगळे व अतुल गुगळे यास तुम्ही माझ्या खोलीतील साहित्य का काढले विचारले असता


पुतण्यास आम्हाला काही एक विचारायचे नाही. तु या घरात राहीचे नाही, तुझा काही संबंध नाही तु इथे राहीलास तर तुला आम्ही जीवे मारून टाकु अशी धमकी दिली म्हणून बार्शी पोलीसात गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास सपोनि गणेश शिंदे हे करीत आहेत .


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here