राज्यातील आठ लाख विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका – वरूण सरदेसाई

0
218

राज्यातील आठ लाख विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका – वरूण सरदेसाई

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विषयावरून ‘ठाकरे सरकारला धक्का’ अशा हेडलाईन खाली बातमी चालविणाऱ्या एका वृत्तवाहिनीला युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. “धक्का ठाकरे सरकारला नाही तर ८ लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि आयुष्याला लागू शकतो.. राजकारण करायला खूप विषय आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ नको…”, अशा शब्दात वरूण सरदेसाई यांनी हे प्रतिउत्तर दिले आहे. परीक्षांच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारच्या बाबतीत अनेक बातम्या व तर्कवितर्क लावले जात आहेत. महाराष्ट्रातच नव्हते तर संपूर्ण देशात कोरोनाचे प्रमाण वाढत आहेत. महाराष्ट्रात याच कारणामुळे ठाकरे सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

परंतु यूजीसीने यावर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठांना दिल्यामुळे युवासेनेने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात अंतिम वर्षातील सुमारे आठ लाख परीक्षार्थी असून, त्यांच्या व शिक्षकांच्या जीवाशी आपण खेळू शकत नाही, असे म्हणत युवासेनेने, महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांनी केलेली मागणी विचारात घेऊन राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्या होत्या.

परंतु याविषयी वेळोवेळी आक्रमकपणे, मुद्देसूद व विद्यार्थी हिताचे विषय मांडून, ”परीक्षा घेतल्या तर महाराष्ट्रातील आठ लाख विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो”, असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here