मुंबईतील ताज हॉटेल उडवण्याची धमकी, पाकिस्तानातून आला फोन

0
298

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल (Taj Hotel Mumbai) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. हा धमकीने भरलेला फोन (threat call) पाकिस्तानातून (Pakistan) आला आहे. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांना या प्रकरणी सूचना देण्यात आली आहे. या धमकीच्या फोननंतर ताजच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. असं सांगितलं जातयं की धमकी देणाऱ्यांनी ताजमध्ये २६/११ सारखा हल्ला करणार असल्याचे सांगितले आहे. कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातून मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये फोन करण्यात आला. 


आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली की, कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला दहशतवादी हल्ला सर्वांनी पाहिला आहे. आता ताज हॉटेलमध्ये २६/११ सारखा हल्ला पुन्हा एकदा होईल. 

पाकिस्तानातून आला कॉल

ताज हॉटेल प्रशासनाने पोलिसांना धमकीची सूचना दिली. असं सांगितलं जातयं की हा धमकीचा फोन पाकिस्तानातून आला होता. रात्रभर मुंबई पोलीस आणि हॉटेल स्टाफने मिळून संपूर्ण हॉटेलच्या सुरक्षेची तपासणी केली. 

रात्रभर सुरू होता तपास 

धमकीचा फोन आल्यानंतर हॉटेलमध्ये रात्रीपासूनच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. येथे येणारे पाहुणे तसेच इतरांवर कडक लक्ष ठेवले जात आहे. हॉटेलमध्ये राहत असलेल्या सर्वांची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. यासोबतच दक्षिण मुंबईत पोलिसांची नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. 

पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्सचेंजवर हल्ला

पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्सचेंजवर सोमवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. चार सशस्त्र दहशतवादयांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात एकूण ९ जण ठार झाले होते. सुरूवातीला या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि तीन सुरक्षारक ठार झाले होते. दरम्यान, हल्ला करणाऱ्या चारही दहशताद्यांना पोलिसांनी ठार केल्याचा दावा पाकिस्तानने केला. 

२६/११ हल्ला

२६ नोव्हेंबर २००८मध्ये मुंबईत भयानक दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ३००हून अधिक जण यात जखमी झाले होते. लष्कर ए तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला निशाणा केला होता. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here