सोलापूर शहरात 8 पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू; ग्रामीण भागात 61 पॉझिटिव्ह एक मृत्यू

0
399

सोलापूर : शहरातील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींची संख्या तीनशेहून अधिक असतानाही मंगळवारी (ता. 14) अवघ्या 40 व्यक्‍तींचेच अहवाल महापालिकेस प्राप्त झाले. त्यानुसार आठ व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या असून तिघांचा मृत्यू झाला आहे. आता शहरातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 345 झाली असून मृतांची संख्या 309 झाली आहे.

सोलापूर ग्रामीण मध्ये आज 389 अहवाल प्राप्त झाले .यात 328 निगेटिव्ह, 61 पॉझिटिव्ह, 1 मृत आहे. ग्रामीणमध्ये आज 47 जण कोरोना मुक्त झाले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शहरात ‘या’ ठिकाणी सापडले नवे रुग्ण
दमाणी नगर (लक्ष्मी पेठ), जानकी नगर (जुळे सोलापूर), रेल्वे क्‍वार्टर (मोदी), डीआरएम ऑफिसजवळ (रेल्वे लाईन), मंत्री चंडक (विजयपूर रोड), बसवेश्‍वर नगर, हत्तुरे नगर (होटगी रोड), कर्णिक नगर येथे आज एकूण आठ नवे रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे पाच्छा पेठेतील 80 वर्षीय पुरुष, मडकी वस्ती येथील 65 वर्षीय पुरुष आणि आंबेडकर नगर (कुमठा नाका) येथील 84 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , माळशिरस, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी तालुक्‍यातील आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 389 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 328अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 61 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 960 रुग्णांपैकी 611पुरुष 349स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 415 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट – 160
मंगळवेढा- 5
बार्शी – 213
माढा- 27
माळशिरस – 15
मोहोळ- 54
उत्तर सोलापूर – 102
करमाळा- 13
सांगोला – 6
पंढरपूर 57
दक्षिण सोलापूर – 308
एकूण – 960

कोरोना बाधित
शहर 3345
ग्रामीण 960
एकूण 4305

मृत
शहर 309
ग्रामीण 39
एकूण 348

उपचार घेणारे
शहर 1195
ग्रामीण 506
एकूण 1701

बरे झालेले
शहर 1841
ग्रामीण 415
एकूण 2256

सोलापूर शहरात आज केवळ 40 अहवाल प्राप्त झाले .यात 32 निगेटिव्ह, 8 पॉझिटिव्ह, 3 मृत अशी आकडेवारी आहे .तर आज शहरात 68 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

सोलापूर ग्रामीण मध्ये आज 389 अहवाल प्राप्त झाले .यात 328 निगेटिव्ह, 61 पॉझिटिव्ह, 1 मृत आहे. ग्रामीणमध्ये आज 47 जण कोरोना मुक्त झाले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here