करमाळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी – चिखलठाण येथील लहान मुलगी ठार

0
314

करमाळा: करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्या आता चिखलठाण परिसरात दाखल झालेला आहे. सोमवार दिनांक 7 रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान चिखलठाण नं-१ येथे ऊसतोड कामगाराच्या एका ८ वर्षीय लहान मुलीवर त्याने हल्ला केला, मुलगी गंभीर जखमी झालेली असताना तिला करमाळा येथे कुटीर रूग्णालयात दाखल केले असता सदरील मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.

गेल्या चार दिवसातील ही तिसरी घटना असून या अगोदर फुंदेवाडी येथील एका पुरूषाचा तर अंजनडोह येथील एका महिलेचा बिबट्याचा हल्लात मृत्यू झालेला आहे. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नंदुरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुसाने येथील फुलाबाई अरचंद कोटली या ८ वर्षीय लहान मुलीवर चिखलठाण-१ येथील जि प चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात बिबट्याने हल्ला केला. सदरील मुलीचे पालक हे ऊसतोडणी करण्यासाठी येथे आले होते. ऊसतोडणी सुरू असताना बाजूलाच लहान मुले खेळत होती त्यावेळी बिबट्याने सदरील लहान मुलीवर हल्ला केला, या हल्लात मुलगी गंभीर जखमी होऊन मृत पावली आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here