वालवड गावात स्मशानभूमीच नाही, कुटुंबीयांनी मृतदेह आणला चक्क तहसील कार्यालयात

0
170

वालवड गावात स्मशानभूमीच नाही, कुटुंबीयांनी मृतदेह आणला चक्क तहसील कार्यालयात

बार्शी – मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीही नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील वालवड गावातील झोबांडे कुटुबीयांनी घरातील महिलेचे निधन झाल्यानंतर मृतदेह चक्क तहसील कार्यालयातच आणून ठेवला होता. अखेर, पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि तहसीलदार सुनिल शेरखाने यांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह गावी नेण्यात आला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तालुक्यातील वालवड येथील अनिता गोकुळ कांबळे यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर वालवड येथे अंत्यसंस्कार करत असताना त्यांना विरोध करण्यात आला. त्यामुळे मृत व्यक्तीच्या भावजय प्रमिला झोंबाडे यांनी आज बार्शी तहसील कार्यालयातच त्यांचा मृतदेह आणला होता. गावातील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून वादात आहे.

गेल्या वर्षीही माझ्या आजीचे निधन झाले त्यावेळी आणि आजही दोनदा लाकडे अंत्यसंस्कारासाठी नेली पण अडवणूक करण्यात आली, लाकडे काढायला लावली. तहसील कार्यालयासमोर यापूर्वी उपोषण, धरणे आंदोलन केले. पण, आश्वासनाशिवाय काहीं मिळाले नाही. त्यामुळेच, या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मृतदेह तहसील कार्यालय येथे आणल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, पोलीस आणि प्रशासनाचा मोठा फौजफाटा याठिकाणी जमला होता. पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here