बार्शीतील मोटरसायकलच्या चोऱ्या थांबेनात

0
19
Black motorbike parked in a dark lot. Original public domain image from Wikimedia Commons

बार्शी : बार्शीतील राजमाता नगर, उपळाई रोड येथून पुन्हा मोटरसायकल चोरीला जाण्याची घटना घडली.

रामेश्वर परमेश्वर मुळे (वय ४०) रा.राजमाता नगर, उपळाई रस्ता, बार्शी यांचे आडत दुकान असून, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी रात्री आठचे सुमारास ते व्यवसाय करुन घरी आले. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र. एमएच-१३-सीपी-२७५६ ही घरासमोर हँडल लॉक करुन लावली. त्यानंतर जेवण करुन एक तासाने बाहेर आले असता, घरासमोर लावलेली मोटरसायकल दिसून आली नाही. आजूबाजूस व परिसरात शोध घेऊनही न सापडल्यामुळे त्यांनी बार्शी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


मोटरसायकलच्या चोऱ्या काही थांबेनात
यापूर्वी बार्शी शहरांतून १ फेब्रुवारीला मंगळवार पेठेतून बागवान, १० फेब्रुवारीला तेलगिरणी चौकातून होनाळे , २ मार्चला उपळाई रोडवरुन रामगुडे, १२ मार्चला देशपांडे वाडा येथून आंबेकर, ६ एप्रिल रोजी पाटील प्लॉट येथून जगदाळे यांच्या मोटरसायकल चोरीस गेलेल्या आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here