तुमच्या मुलीची मैत्रीण आहे असे सांगत करमाळा भाजी मंडईतून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी –

0
158

तुमच्या मुलीची मैत्रीण आहे असे सांगत करमाळा भाजी मंडईतून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी –


करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील एका महिलेला तुमच्या मुलीची मैत्रीण असल्याचे सांगत नजर चुकवून पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र चुरून नेले आहे. यात एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. २९) भर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास भाजी मंडईत हा प्रकार घडला आहे. यामध्ये कुसुम हरिश्चंद्र पेठकर (वय 68, रा. कुंकु गल्ली) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पेठकर या शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घरातुन भाजी आणण्यासाठी भाजी मंडर्इत गेल्या होत्या. भाजी मंडर्इमध्ये भाजी घेत असताना त्यांच्याजवळ एक अनोळखी महिला आली.

‘मी तुमची मुलगी मनिषा हिची मैत्रीण आहे. आपण भाजी मंडर्इमधील बाथरुमच्या समोर असलेल्या वटयावर बसु’, असे ती म्हणाली. तेव्हा पेठकर तिच्यासोबत वटयावर बसल्या. तेव्हा ती म्हणाली ‘तेथे एका बार्इच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र चोरी गेले आहे. तुमच्या गळयातील सोन्याचे गंठन काढुन पर्समध्ये ठेवा. त्यावेळी माझ्या गळयातील सोन्याचे गंठन काढुन पर्समध्ये ठेवुन आम्ही बोलत असताना तिने नजर चुकुन पर्स मधुन सोन्याचे गंठन चोरुन नेले.

काही वेळानंतर त्या नातेवार्इकांच्या दुकानी गेल्या तेव्हा गळयातील सोन्याचे गंठन कोठे आहे? असे विचारले त्यानंतर त्यांनी पर्समध्ये आहे तेव्हा पर्सची चैन उघडुन चेक केली. तेव्हा चोरी झाली असल्याचे लक्षात आले. यात 30 हजाराचे गंठन पर्समधुन नजर चुकवुन काढुन नेल्याप्रकरणी अनोळखी महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here