बार्शी – कोरोनाचे वातावरण निवळते न निवळते तोच चोरांचा सुळसुळाट चालू झाला आहे. बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरी या गावात एकाच दिवशी तब्बल सहा घरफोड्या झाल्याने संपूर्ण गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपास सुरू आहे. मात्र, चोरट्यांनी एकाच गावात अनेक घरफोड्या करत पोलिसांच आव्हान दिलंय.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

श्रीपतपिंपरी मधील घरफोड्या झालेल्यापैकी मालन पिंगळे, हनुमंत चव्हाण , आनंद घाडके, पिंटू येवारे, मंगल घाडके व इतर काही घरामध्ये चोरी झाली आहे .यामध्ये रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेले आहेत.

ग्रामीण भागात अश्याप्रकारे घरफोड्या होण्याची हि पहिलीच वेळ आहे. बार्शी ग्रामीण पोलीस यांनी गावामध्ये तात्काळ भेट दिली आहे व पुढील तपास चालू आहे .