कळंब तालुका पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद- खा.ओमराजे निंबाळकर

0
195

कळंब तालुका पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद- खा.ओमराजे निंबाळकर

पत्रकार भवनासाठी दहा लाख रुपये निधी- आ. कैलास पाटील

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कळंब: कळंब तालुक्यातील पत्रकारांना 1 लाख रुपये कोरोना कवच म्हणून विम्याचे वाटप करणारा राज्यातील एकमेव संघ म्हणून कळंब तालुका पञकार संघाला ओळखले जाते, यापुढे देखील पत्रकारांना लागेल ती मदत करण्याचे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

येथील शिवसेना कार्यालयात कळंब तालुका पञकार संघाच्या वतीने कोरोना काळात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना कोरोना कवच विम्या चे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब तालुका शिवसेना प्रमुख शिवाजी कापसे हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, संभाजी ब्रिगेडचे पुणे चे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर पालकर यांनी केले, तर सूत्र संचलन बालाजी सुरवसे यांनी केले तर आभार सतीश मातने यांनी मानले.

या वेळी खा. ओमराजे म्हणाले कि लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून पञकाकडे पाहीले जाते. कोविड १९ या माहामारी च्या काळात स्वत जिवाची पर्वा न करता बाहेर फिरुन वांर्ताकंन केले आहे, त्यांना कसलीही सुरक्षा मिळाली नाही , या पत्रकार संघाने पुढाकार घेवून पत्रकारांना विम्याची सुरक्षा दिली आहे.. तालुका पत्रकार संघाने पञकारांना विम्याचे वापट केले ही एक राज्यात एक आदर्श बाब आहे.

अध्यक्षीय मनोगतात शिवाजी कापसे मनाले कि, कळंब तालुका पत्रकार संघ पुर्वीपासुनच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. महाराष्ट्र राज्यात एक आदर्श संघ म्हणून पुरस्कार प्राप्त असा संघ असून या कामाचे कौतुक केले.
यावेळी शहरातील पत्रकार उपस्थित होते.

आमदार देणार दहा लाखाचा निधी

कळंब नगर परिषदने कळंब पत्रकार संघाला पत्रकार भवनाला जागा दिली आहे, आणि लवकरच पञकार भवन उभारणी साठी दहा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार कैलास दादा पाटील यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here