बार्शी : माझ्या मुलाला का बोलतो या कारणावरुन, आरिफ शमशोद्दीन शेख व पप्पू शमशोद्दीन शेख (दोघेही रा. नाळे प्लॉट, बार्शी) यांनी शिवीगाळी करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लाकडी दांडक्याने डोक्यात मारले. त्यामुळे रक्तस्त्राव झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दहा टाके पडले आहेत.
अशी फिर्याद उपचार घेत असलेला रिक्षाचालक जावेद इक्बाल पठाण (वय२९) रा. नाळे प्लॉट, बार्शी याने दिली आहे. त्यानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना दि. २७ एप्रिल रोजी रात्री साडेदहाचे सुमारास घडली.
