दिल्लीतील राजकारणात शिंदे घराण्याचे वजन….! जाणून घ्या शिंदे घराण्याचा राजकीय इतिहास..

0
325

दिल्लीतील राजकारणात शिंदे घराण्याचे वजन….! वाचा सविस्तर-

ग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हे या संस्थानाचे संस्थापक पुरुष होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या संस्थानाची राजधानी पूर्वी उज्जैन होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच राजधानीचे मुख्य ठिकाण झाले. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांच्यापेक्षाही महादजी शिंदे प्रसिद्ध पावले.

ते राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव होते. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले, तर महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले. मात्र पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने खालसा होऊन देशात लोकशाही नांदू लागली.

ग्वाल्हेरचे शिंदे घराणं म्हणजे मराठेशाहीतील महत्वाच सरदार घराण म्हणून ओळखला जायायचं. एकेकाळी दिल्लीची पातशाही यांच्या इशाऱ्यावर चालायची. ब्रिटीशांच्या राज्यातही शिंदेना २१ तोफांचा मान दिल्याची नोंद आहे. स्वातंत्र्यानंतर ग्वाल्हेर संस्थान विलीन झालं मात्र तिथल्या जनतेच्या हृदयावर मात्र शिंदेच राज्य कायम राहिलं आहे आणि दिसून सुद्धा आला आहे.

ग्वाल्हेरचे राजे माधवराव शिंदे यांचा राजकारणात प्रवेश

१९७७ मध्ये आणीबाणीनंतर जनसंघ आणि आपली आई विजयाराजे शिंदे यांच्यापासून माधवराव शिंदे विभक्त झाले. १९८४ मध्ये माधवराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

या लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला

आणि ही निवडणूक जिंकून त्यांना राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात नागरी विमान वाहतूक मंत्री पदी वर्णी सुद्धा लागली होती. पुढे २००१ साली प्रचारानिमित्त जात असताना विमान उत्तर प्रदेश राज्यात मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

माधवराव शिंदे यांचं एका विमान अपघातात निधन झाले. ज्योतिरादित्य शिंदे हे माधवराव शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि आपल्या वडिलांचा राजकीय वारसा यशस्वीपणे पुढेही चालवला. गुणा मतदार संघातून ते निवडून आले .

पुढे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या युवा टीम मधील ते एक सक्रिय सभासद बनले आणि केंद्रीय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. त्यांची प्रेमकथा सुद्धा फारच रंजक आहे. त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी ह्या गुजरात येथील बडोदयाच्या मराठा राजघराण्यात झालेला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांची घरवापसी

अखेर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या बरोबर मध्यप्रदेश मधील २२ समर्थक आमदारांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दित शिंदे यांच्या बरोबर जाणे पसंत केले. त्यांच्या या निर्णयामुळे कमलनाथ सरकार पडून पुन्हा तिथे भाजपाचे कमल फुलले होते. अखेर २३ मार्च २०२० रोजी पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान जोतिरादित्य सिंदे यांच्या मदतीने भाजपा पक्षाचे सरकार स्थापन केले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here